Mahindra Thar : महिंद्रा थारचा नवा थाट; लवकरच धावणार ५ दरवाजांची डॅशिंग एसयूव्ही
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mahindra Thar : महिंद्रा थारचा नवा थाट; लवकरच धावणार ५ दरवाजांची डॅशिंग एसयूव्ही

Mahindra Thar : महिंद्रा थारचा नवा थाट; लवकरच धावणार ५ दरवाजांची डॅशिंग एसयूव्ही

Updated Jul 15, 2024 11:03 PM IST

महिंद्रा थारचं एक नवीन मॉडेल बाजारात दाखल होणार आहे. या मॉडेलबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. जाणून घेऊ या या मॉडेलबद्दल.

The most prominent change lies in the grille. The Mahindra Thar Armada sports a unique six-slot design with a horizontal slat running across, replacing the familiar grille of the three-door model.
The most prominent change lies in the grille. The Mahindra Thar Armada sports a unique six-slot design with a horizontal slat running across, replacing the familiar grille of the three-door model. (@mahindrathar5doorarmada/instagram)

महिंद्रा कंपनीच्या आगामी पाच दरवाज्यांचा समावेश असलेली ‘महिंद्रा थार’ने बाजारात प्रचंड उत्सुकता वाढवली आहे. खरंतर ही कार स्वातंत्र्यदिनी म्हणजे पुढील महिन्यात १५ ऑगस्ट रोजी अधिकृत लॉंच करण्यात येणार आहे. कंपनीने लॉंचिंगपूर्वी या एसयूव्ही कारच्या डिझाइनचा खुलासा केला आहे. थार श्रेणीतील या नवीन कारचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीच्या तीन दरवाजांच्या तुलनेत या कारमध्ये एकूण पाच दरवाजे आहेत. या पाच दरवाजांच्या कारला कंपनीने ‘महिंद्रा थार आर्माडा’ (Mahindra Thar Armada)असे नाव दिले जाणार आहे.

या नवीन कारमध्ये सर्वात ठळक बदल हा ग्रीलमध्ये करण्यात आला आहे. पूर्वीच्या तीन दरवाजांच्या ‘महिंद्रा थार पेक्षा 'आर्माडा’मध्ये सहा स्लॉटचे अनोखे डिझाइन देण्यात आले आहे. सिग्नेचर थार फीचर असलेले कारचे हेडलाइट्स आता प्रथमताच LED प्रोजेक्टर युनिटने सुसज्ज आहेत. हेडलाइट्स C-आकाराच्या डीआरएल ( Daytime Running Lights) द्वारे फ्रेम केलेले आहेत. तीन दरवाजे असलेल्या थारच्या विपरीत, पाच दरवाजांच्या थारमध्ये अँगल सी-पिलरचा समावेश केलेला आहे.

तथापि, इंडिकेटर, आरसे आणि डोअर हँडलच्या डिझाइनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. या कारमध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या आरशांवर ३६० अंशात फिरणारा कॅमेरा बसवण्यात आला आहे.

नव्या महिंद्रा थार आर्माडाची इतर वैशिष्ट्ये

हाती आलेल्या फोटोंमधून १५ ऑगस्ट रोजी लॉंच होऊ घातलेली महिंद्रा थार आर्माडाची बेस आणि टॉप-एंड मॉडेलमधील फरक स्पष्ट होते. बेस मॉडेलमध्ये बेसिक स्टीलपासून तयार केलेली चाके आणि हॅलोजन हेडलॅम्प्स असण्याची शक्यता आहे. तर टॉप-एण्ड व्हेरिएंटमध्ये वाढीव दृश्यमानतेसाठी स्टायलिश अलॉय व्हील्स आणि आधुनिक LED हेडलॅम्प्स दिले जाऊ शकतात.

नव्या कारमध्ये इंटिरिअर फीचर्स देखील वेगळे असू शकतात. महिंद्रा थारच्या बेसिक मॉडेल छोट्या आकाराचे इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि हाताळता येणारा एसी आहे. याउलट, टॉप-एंड मॉडेलमध्ये XUV 400 सारखा मोठा टचस्क्रीन आणि स्वयंचलित एसीची सुविधा असू शकते.

याव्यतिरिक्त, महिंद्रा थार आर्माडामध्ये अतिशय आगळेवेगळे असे सनरूफ असण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवीन महिंद्रा थार आर्माडा नेमकी कशी दिसणार, याचे चित्र आगामी काळातच म्हणजे लॉंचिंगच्या पूर्वी स्पष्ट होईल.

मागील स्पाय शॉट्समध्ये पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि मोठ्या 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचे संकेत देण्यात आले होते, जे शक्यतो महिंद्रा एक्सयूव्ही 3 एक्सओकडून घेतले गेले होते. रिअर एसी व्हेंट आणि संभाव्य सनरूफ यांचाही फीचर लिस्टमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

'महिंद्रा थार आर्माडा'मध्ये ऊर्जा निर्मितीसाठी दोन इंजिनचा समावेश आहे. एक २.२ लीटर क्षमतेचे डिझेल इंजिन आणि दुसरे २.० लीटर एमटी टर्बो-पेट्रोल इंजिन. दोन्ही इंजिनमध्ये ६-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असण्याची शक्यता आहे. ऑफ-रोड क्षमता वाढविण्यासाठी फोर-व्हील ड्राइव्ह मानक असेल, तर महिंद्रा बजेट-जागरूक खरेदीदारांसाठी रिअर-व्हील-ड्राइव्ह व्हेरिएंट देखील ऑफर करू शकते. ग्राहकांना त्यांच्या गरजा आणि बजेटला साजेशी महिंद्रा थार आर्माडा निवडण्याची लवचिकता देतो. हा द्विआयामी दृष्टिकोन ग्राहकांना त्यांच्या गरजा आणि बजेटला साजेशी महिंद्रा थार आर्माडा निवडण्याची लवचिकता देतो.

Whats_app_banner