maharashtra budget 2024 today live updates : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईतील विधानभवनात सुरू असून अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. महिला, शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
> निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोन्ही बाजूनी… तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही… या अभंगाच्या ओळी उद्धृत करत अजित पवारांनी संपवलं भाषण.
> राज्यातील पेट्रोल, डिझेलवरील करात समानता आणण्याची घोषणा. मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील डिझेवरील सध्याचा कर २४ टक्क्यावरून २१ टक्के केला जाणार. तर, पेट्रोलवरील कर २६ टक्क्यावरून २५ टक्क्यांवर आणला जाणार. त्यामुळं मुंबई, ठाणे व नवी मुंबईत पेट्रोल ६५ पैशांनी व डिझेल २ रुपये ०७ पैशांनी स्वस्त होणार - अजित पवार
> अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या भागाचं वाचन सुरू
> नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात १५० कोटींची तरतूद. दुसऱ्या टप्प्यात २११ कोटींची विकासकामं करणार - अजित पवार
> मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा. राज्यातील ४४ लाख ६ हजार कृषी पंपधारकांना साडेसात हॉर्सपॉवर पर्यंत मोफत वीज दिली जाणार
> दिव्यांगांसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजनेची घोषणा
> संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील अर्थसहाय्य १ हजारवरून दीड हजार रुपये - अजित पवार
> हयात लेके चलो, कायनात लेके चलो… चलो तो सारे जमाने को, साथ लेके चलो - अजित पवार
> सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कुबा डायव्हिंग केंद्र स्थापन करणार
> बुलढाणा जिल्ह्यात नवीन आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार - अजित पवार
> सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी ५० हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल - अजित पवार
> मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा.
> तुफानों मे संभलना जानते है, अंधेरों को बदलना जानते है… चरागों का कोई मजहब नही है, वो हर महफिल में जलना जानते है… अजित पवारांची शेरोशायरी
> शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप दिले जातील - अजित पवार
> जलयुक्त शिवार अभियान २ अंतर्गत यावर्षी ६५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
> स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार - अजित पवार
> नवी मुंबईत बांधण्यात येणाऱ्या युनिटी मॉलमध्ये महिला बचत गटाच्या उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाईल - अजित पवार
> मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार.
> राज्यातील सर्व उपकेंद्रात स्तन व गर्भाशयाच्या मोफत वैद्यकीय चाचणीसाठी निधीची तरतूद
> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा. या अंतर्गत वय २१ ते ६० वर्षांपर्यंतच्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील. त्यासाठी ४६ हजार कोटींचा निधी दिला जाईल. जुलै २०२४ पासून ही योजना सुरू होईल - अजित पवार
> मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय
> पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्ताव पाठवत आहोत. प्रति दिंडी २० हजार रुपयांचा निधी. देहू, आळंदी, पंढरपूर या पालखी मार्गावरील वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी, गरजेनुसार मोफत उपचार देणार - अजित पवार
> संतांचा अभंग म्हणत अर्थसंकल्प वाचनास सुरुवात
> अजित पवार यांचं अर्थसंकल्पीय भाषण सुरू
> विधानसभेचं कामकाज पुन्हा सुरू.
> प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात
> सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता
> आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पाकडं सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचंही लक्ष
> राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार
> राज्य विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात
संबंधित बातम्या