Viral Video: घराबाहेर रांगोळी काढणाऱ्या दोन मुलींना कारनं चिरडलं, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Viral Video: घराबाहेर रांगोळी काढणाऱ्या दोन मुलींना कारनं चिरडलं, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: घराबाहेर रांगोळी काढणाऱ्या दोन मुलींना कारनं चिरडलं, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल!

Updated Oct 29, 2024 07:33 PM IST

Viral Video: मध्य प्रदेशातील इंदूरमधील एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला असून एका भरधाव कारने घराबाहेर रांगोळी काढणाऱ्या मुलींना चिरडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ: घरासमोर रांगोळी काढणाऱ्या दोन मुलींना भरधाव कारने चिरडले
व्हायरल व्हिडिओ: घरासमोर रांगोळी काढणाऱ्या दोन मुलींना भरधाव कारने चिरडले

Viral News: मध्य प्रदेशातील इंदूरमधील एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे. घराबाहेर रांगोळी काढणाऱ्या दोन मुलींना भरधाव कारने चिरडले.  या अपघातातील दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना एअरोड्रम पोलिस स्टेशन परिसरातील आहे.  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन मुली घराबाहेर रस्त्याच्या कडेला रांगोळ्या काढताना दिसत आहेत. तेवढ्यात एक भरधाव कार त्यांना चिरडले.  गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली एक महिला या अपघातातून थोडक्यात बचावली. हा अपघात इतका भीषण होता की, कार धडकल्याचा मोठा आवाज झाला. अपघातानंतर चालक कारमधून उतरून पळून गेल्याचे दिसत आहे. 

पोलिस उपायुक्त विनोदकुमार मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांशी प्रजापत (वय, २१) आणि नव्या प्रजापत (वय, १४) या दोघींना सोमवारी सायंकाळी भरधाव कारने चिरडले. त्यावेळी दोन्ही मुली घराबाहेर रांगोळ्या काढत होत्या. घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला, ज्याला चालकाला बेतमा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांची कार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

चालक अल्पवयीन असून कार शिकत होता. त्याच्या वयाची खातरजमा करण्यासाठी आम्ही तपासणी करत आहोत. तो एका ओळखीच्या व्यक्तीची गाडी चालवत होता. या घटनेतील एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती डीसीपींनी दिली. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या घटनेवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणातील दोषीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Whats_app_banner