Samsung Galaxy S24 Series Price: सॅमसंग कंपनीची नुकतीच लॉन्च झालेली गॅलेक्सी एस २४ सीरिज भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. मेड इन इंडिया सॅमसंग गॅलेक्सी एस २४ मध्ये ग्राहकांना लाइव्ह ट्रान्सलेट, इंटरप्रिटर, चॅट असिस्ट, नोट असिस्ट आणि ट्रान्सक्रिप्ट असिस्ट यांसारखे फीचर्स मिळत आहेत. सॅमसंग कीबोर्डमध्ये तयार केलेले एआय हिंदीसह १३ भाषांमध्ये रिअल-टाइममध्ये संदेशांचे भाषांतर देखील करू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम व्हायोलेट आणि टायटॅनियम ब्लॅक रंगातील स्मार्टफोनची किंमत १ लाख २९ हजार ९९९ (१२ जीबी रॅम +२५६ जीबी स्टोरेज) रुपयांपासून सुरु होते. तर, १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १ लाख ३९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्राच्या १२ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत १ लाख ५९ हजार ९९९ रुपये आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या कोबाल्ट व्हायलेट आणि ओनिक्स ब्लॅक रंगातील स्मार्टफोनची किंमत ९९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर, १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत १ लाख ०९ हजार ९९९ रुपये आहे.
अम्बेर येल्लो, कोबाल्ट व्हायलेट ओनिक्स ब्लॅक रंगातील गॅलेक्सी एस २४ (८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज) स्मार्टफोनची किंमत ७९ हजार ९९९ रुपयांपासून आणि ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ८९ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते.
सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्टा आणि सॅमसंग गॅलेक्सी एस २४ प्लस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १२ हजारांची सूट मिळणार आहे. तर, गॅलेक्सी एस २४ च्या खरेदीवर ग्राहकांना १० हजारांची सूट मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २४ सीरिज भारतातील नोएडा येथील कारखान्यात तयार केली जात आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २४ चा सर्वाधिक प्री बुकींग झालेल्या टॉप-५ स्मार्टफोनच्या यादीत समावेश झाला आहे.
संबंधित बातम्या