LPG Price hike : बजेटच्या दिवशीच धक्का! LPG सिलेंडरच्या किंमती वाढल्या, असे आहेत नवे दर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LPG Price hike : बजेटच्या दिवशीच धक्का! LPG सिलेंडरच्या किंमती वाढल्या, असे आहेत नवे दर

LPG Price hike : बजेटच्या दिवशीच धक्का! LPG सिलेंडरच्या किंमती वाढल्या, असे आहेत नवे दर

Feb 01, 2024 07:09 AM IST

LPG Price hike update : आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असतांना तेल कंपन्यांनी एलपीजीच्या व्यावसायीक सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर १७६९.५० रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये १८६९ रुपयांऐवजी १८८७ रुपयांना तर मुंबईत व्यावसायीक सिलेंडर आत १७२३.५० रुपयांना मिळणार आहे.

commercial lpg gas cylinder price hike
commercial lpg gas cylinder price hike (PTI)

LPG Price hike update : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना गॅस दरवाढीचा धक्का बसला आहे. आज तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरचे नवे दर जाहीर केले असून त्यात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडर १४ रुपयांनी महागला आहे. दिल्ली, जयपूर, इंदूर, लखनौ, अहमदाबाद, मेरठ, आग्रा, मुंबईसह संपूर्ण देशात ही वाढ झाली आहे. ही दरवाढ दर फक्त १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी आहेत. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नाहीत.

Maharashtra Weather update : राज्यात थंडीची लाट! मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ मराठवाड्याच्या तापमानात होणार घट

दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९०३ रुपये आणि कोलकात्यात ९२९ रुपये आहे. आज १ फेब्रुवारी रोजी मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये दर आहेत. घरगुती सिलिंडरच्या किमती ३० ऑगस्ट २०२३ रोजी शेवटचा बदलण्यात आल्या होत्या. १ मार्च २०२३ रोजी दिल्लीत एलपीजीचा दर प्रति सिलिंडर ११०३ रुपये होते. यानंतर २०० रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडर हा स्वस्त झाला.

Kolhapur news: धावत्या बसमधील पत्रा सरकला! विद्यार्थिनी थेट एसटीच्या इंजिनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी; कोल्हापुरातील घटना

आज किती दराने व्यावसायीक सिलेंडर मिळेल?

आज दिल्लीत १७५५.५० रुपयांऐवजी १७६९.५० रुपयांना व्यावसायिक सिलिंडर मिळणार आहे. कोलकातामध्ये हा एलपीजी सिलिंडर आजपासून १८६९ रुपयांऐवजी १८८७ रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता १७०८.५० रुपयांवरून १७२३.५० रुपयांवर पोहोचले आहेत चेन्नईमध्ये हे दर १९२४.५० रुपयांवरून १९३७ रुपयांवर पोहोचले आहेत.

आतापर्यंत  ५० वेळा दर बदलले 

गेल्या तीन वर्षांत घरगुती सिलिंडरचे दर केवळ १७ वेळा बदलले असले तरी, व्यावसायिक सिलिंडरचे दर जवळपास प्रत्येक महिन्यात बदलले. या बदलांमुळे ग्राहकांना कधी दिलासा मिळाला तर कधी अडचणींचा सामना करावा लागला. IOC डेटानुसार, १ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीत १९ किलो LPG सिलेंडरची किंमत १९४९ रुपये होती. तेव्हापासून दर ५० वेळा बदलण्यात आले आहेत.

Whats_app_banner