LPG Price 1 December: राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुका होताच आता महागाईचा भडका उडाला आहे. वर्षांचा शेवटचा डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच महागाईचा मोठा धक्का ग्राहकांना बसला आहे. आज रविवार १ डिसेंबर पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. आजपासून तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. यावेळीही ही वाढ केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये झाली आहे. तब्बल १८.५० रुपयांनी हा सिलेंदार महागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमितीत मोठी वाढ झाली आहे. मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात १६.५० रुपयांनी वाढ झाली आहे. येथे १७५४.५० रुपयांना मिळणारा सिलिंडर आजपासून १७७१ रुपयांना मिळणार आहे.
एलपीजी ग्राहकांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. एलपीजी सिलिंडर आजपासून १८.५० रुपयांनी महागला आहे. ही वाढ दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्व देशात झाली आहे. महागाईच्या या धक्क्याचा फटका केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या ग्राहकांना बसला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात १६.५० रुपयांनी वाढ झाली आहे. येथे १७५४.५० रुपयांना मिळणारा सिलिंडर आजपासून १७७१ रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीत १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १८१८.५०रुपयांना मिळणार आहे. गेल्या महिन्यात हा सिलेंडर १८०२ रुपयांना मिळत होता. कोलकात्यात हा व्यावसायिक सिलिंडर आता १९२७ रुपये झाला आहे. नोव्हेंबरमध्ये तो फक्त १९११.५० रुपये होता. कोलकात्यात याची किंमत १९८०.५० रुपये झाली आहे. नोव्हेंबरमध्ये कोलकात्यात १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १९६४.५० रुपयांना विकला गेला होता. हाच सिलिंडर आता पाटण्यात २०७२.५ रुपयांना मिळणार आहे.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजही मुंबईत घरगुती सिलेंडरची किंमत ही ८०२.५० रुपये आहे. तर चेन्नईमध्ये हे दर ८१८.५० रुपये आहे. पाटण्यात हे दर ८९२.५० रुपये आहे. तर दिल्लीत १४ किलोचा एलपीजी सिलिंडर ८०३ रुपयांना विकला जात आहे. कोलकात्यात एलपीजी सिलिंडरची किंमत ८२९ रुपये आहे.
या वर्षी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात झालेले बदल
१ नोव्हेंबर १८०२
१ ऑक्टोबर १७४०
१ सप्टेंबर १६९१.५०
१ ऑगस्ट १६५२.५०
१ जुलै १६४६.००
१ जून १६७६.००
१ मे १७४५.५०
१ एप्रिल १७६४.५०
१ मार्च १७९५.००
१ फेब्रुवारी १७६९.५० १ फेब्रुवारी १७६९.५०
१
जानेवारी १७५५.५०
स्त्रोत
: आयओसी, दर दिल्लीचा आहे/