LPG Price 1 September : एलपीजी सिलिंडरचे नवेदर आज १ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एलपीजी गॅस सिलिंडर महाग झाला आहे. मात्र, ही दरवाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झाली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर ३९ रुपयांनी वाढून १६४४ रुपयांवर पोहोचला आहे. पूर्वी तो १६०५ रुपये होता.
तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करून महागाईला धक्का दिला आहे. १ सप्टेंबरपासून कोलकातामध्ये १९ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत १८०२.५० रुपये झाली आहे. पूर्वी हा दर १७६४.५० रुपये होता. देशाच्या आर्थिक राजधा मुंबईत हा निळा सिलेंडर आता १६४४ रुपयांचा झाला आहे. हा पूर्वी १६०५ रुपये होता. तर चेन्नईमध्ये तो १८५५ रुपये झाले आहे, जो दर ऑगस्ट महिन्यात १८१७ रुपयांना झाला आहे. हे दर इंडियन ऑइलच्या इंडेन एलपीजी सिलिंडरचे आहेत.
गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९०३ रुपये होती. सध्या ते फक्त ८०३ रुपयांना उपलब्ध आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. १४.२ किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीत १०५३ रुपये, कोलकात्यात १०७९.०० रुपये, चेन्नईमध्ये १०५२.५० रुपये आणि मुंबईत १०६८.५० रुपयांना उपलब्ध होता. तथापि, १ सप्टेंबर २०२१ रोजी दिल्लीच्या ग्राहकांसाठी सिलिंडर २५ रुपयांनी महाग झाला आणि तो ८८४.५० रुपयांवर आला. यापूर्वी १ सप्टेंबर २०२० रोजी सिलेंडर हा ५९४ रुपयांना विकला जात होता. सप्टेंबर २०१९ मध्ये याच सिलेंडरची किंमत ५९० रुपये होती. तर २०१८ मध्ये त्याची किंमत ८२० रुपये होती. सप्टेंबर २०१७ मध्ये हे दर सर्वाधिक ५९९ रुपये आणि २०१६ मध्ये सर्वात कमी ४६६.५० रुपये होते.