महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा भडका! 'हा' एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला-lpg price 1 october cylinder price surge shock before festivals like dussehra diwali ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा भडका! 'हा' एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला

महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा भडका! 'हा' एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला

Oct 01, 2024 09:32 AM IST

LPG Price 1 October : एलपीजी सिलेंडरचे नवीन दर आज १ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले आहेत. सणांआधीच ग्राहकांना महागाईचा फटका बसणार आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुमारे ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला महागाईचा भडका! एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला, सणासुदीपूर्वी धक्का
ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला महागाईचा भडका! एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला, सणासुदीपूर्वी धक्का (PTI)

LPG Price 1 October: एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर आज १ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले आहेत. दसरा, दिवाळी या सणांच्या आधीच ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुमारे ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आजपासून मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर १६९२.५० रुपयांना तर दिल्लीत १७४० रुपयांना मिळणार आहे. हा दर इंडेन सिलिंडरसाठी आहे. येथे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. १४ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत फक्त ८०३ रुपये आहे.

इंडियन ऑइलने जारी केलेल्या नवीनतम दरांनुसार, आज १ ऑक्टोबरपासून, मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १६९२.५० रुपये, कोलकात्यात १८५०.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १९०३ रुपये असेल. यापूर्वी सप्टेंबरमध्येही एलपीजी सिलिंडरचे दर सुमारे ३९ रुपयांनी वाढून १६९१.५० रुपयांवर पोहोचले होते. हे दर पूर्वी १६५२.५० रुपये होते. कोलकातामध्ये १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता ४८ रुपयांनी महागला आहे.

चेन्नईमध्ये घरगुती सिलिंडर सप्टेंबरच्या ८१८.५० रुपये दराने मिळणार आहे. तर दिल्लीत १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर ९०३ रुपयांच्या जुन्या दराने उपलब्ध आहे. कोलकात्यात ८२९ रुपये आणि मुंबईत ८०२.५० रुपयांना घरगुती सिलेंडर उपलब्ध आहे.

मुंबईते ते दिल्लीपर्यंत सिलिंडरचे दर वाढले

मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १६९२.५० रुपये तर गुरुग्राममध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७५६ रुपयांपर्यंत वाढले आहेत. तर, घरगुती सिलिंडरची किंमत ८११.५० रुपयांवर स्थिर आहे. पाटणा, बिहारमध्येही सिलिंडर महाग झाले आहेत. पाटणामध्ये आजपासून व्यावसायिक सिलेंडर १९९५.५ रुपयांना मिळेल तर घरगुती सिलेंडर ८९२.५० रुपयांच्या जुन्या दराने उपलब्ध होईल.

लखनौ, जयपूर, आग्राचे दर

आज आग्रा, उत्तर प्रदेशमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत केवळ ८१५.५ रुपये आहे, परंतु आता व्यावसायिक सिलेंडरचा दर १७९३.५ रुपये झाला आहे. लखनौमध्ये आज घरगुती एलपीजी सिलिंडर ८४०.५ रुपयांना तर व्यावसायिक गॅस सिलिंडर १८६१ रुपयांना मिळणार आहे. जयपूर, राजस्थानमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर ८०६.५० रुपये आहे. दुसरीकडे, १९ किलोच्या सिलेंडरची किंमत आता १७६७.५ रुपये आहे.

Whats_app_banner