LPG price : ऐन दिवाळीत महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! हा एलपीजी सिलिंडर ६२ रुपयांनी महागला! किती रुपये मोजावे लागणार?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LPG price : ऐन दिवाळीत महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! हा एलपीजी सिलिंडर ६२ रुपयांनी महागला! किती रुपये मोजावे लागणार?

LPG price : ऐन दिवाळीत महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! हा एलपीजी सिलिंडर ६२ रुपयांनी महागला! किती रुपये मोजावे लागणार?

Nov 01, 2024 07:00 AM IST

LPG price hike : संपूर्ण देशात दिवाळी सण साजरा होत असतांना आज १ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुमारे ६२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईलने जाहीर केलेल्या ताज्या दरानुसार, दिल्लीत आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत मोठी वाढ झाली आहे.

ऐन दिवाळीत महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! गॅस सिलिंडर ६२ रुपयांनी महागला! किती रुपये मोजावे लागणार?
ऐन दिवाळीत महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! गॅस सिलिंडर ६२ रुपयांनी महागला! किती रुपये मोजावे लागणार? (HT)

LPG price 1 November : ऐन दिवाळीत ग्राहकांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. आज नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलेंडर महाग झाला. ऑक्टोबर महिन्यात पण १९ किलो व्यावसायिक गॅस महागला होता. आता या महिन्यात सुद्धा गॅसचा भाव वाढला. ऐन सणासुदीत गॅस महागल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. तर १४ किलो घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जशीच्या तशी आहे. त्यात बदल झाला नाही.

   आज, १ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुमारे ६२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईलने जाहीर केलेल्या ताज्या दरानुसार, मुंबईत एलपीजी सिलिंडर आता १७५४.५० रुपयांना मिळणार आहे. तर राजधानी दिल्लीत आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १८०२ रुपयांना मिळणार आहे.  तर कोलकात्यात १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १९११.५० रुपये झाली आहे.चेन्नईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १९६४.५०  रुपयांवर गेली आहे.

मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर इतक्या रुपयांना मिळणार  

मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरकर्त्यांना आता गॅस खरेदीसाठी वाढीव ६२ रुपये मोजावे लागणार आहे. १ ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलिंडर १६९२.५० रुपये होता तर आता त्याची किंमत १७५४.५० रुपये झाला आहे. कोलकात्यात व्यावसायिक सिलेंडर हा १८५०.५०  रुपये होता आणि आता तो १९११.५० रुपये झाला आहे. चेन्नईत १९०३ रुपयांना मिळणारा निळा सिलिंडर आता १९६४.५० रुपयांना मिळणार आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही 

घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नाही. या सिलेंडरच्या किमती आहे तेवढ्याच आहेत.  मुंबईत घरगुती सिलेंडर ८०२.५० रुपयांना आहे. तर  चेन्नईत घरगुती सिलिंडर ८१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.  दिल्लीत १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर ८०३ रुपयांच्या जुन्या दराने उपलब्ध आहे. तर कोलकात्यात हे दर ८२९ रुपये आहेत. 

पाटण्यात आज १४.२ किलोचा इंडेन एलपीजी सिलिंडर ९०१ रुपयांना विकला जात आहे. मात्र, १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर २०७२ रुपयांवर पोहोचला आला आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये आता १९ किलोचा निळा सिलिंडर१८२१रुपयांना मिळणार आहे. तर १४ किलोच्या घरगुती एलपीजी लाल सिलिंडरची किंमत ८१० रुपये आहे.

 

Whats_app_banner