मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LPG Price 1 March : तेल कंपन्यांचा झटका! एलपीजी सिलिंडर तब्बल २५ रुपयांनी महागला

LPG Price 1 March : तेल कंपन्यांचा झटका! एलपीजी सिलिंडर तब्बल २५ रुपयांनी महागला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 01, 2024 04:17 PM IST

LPG Price Hike 1 March: मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने एलपीजी सिलेंडर दरवाढीचा दणका ग्राहकांना दिला आहे. अर्थात, ही दरवाढ व्यावसायिक सिलिंडरपुरती (Commercial Gas Cylinder) मर्यादित आहे.

commercial lpg gas cylinder price hike
commercial lpg gas cylinder price hike (PTI)

LPG Price Hike 1 March : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी, एलपीजी सिलेंडर (Ipg cylinder)च्या किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तेल विपणन कंपन्यांनी आज, शुक्रवारी १ मार्च रॉजी एलपीजी सिलेंडर आणि एटीएफचे दर नव्याने जाहीर केले आहेत. आजपासून दिल्ली आणि मुंबईत एलपीजी सिलिंडर तब्बल २५.५० रुपयांनी महागणार आहे. तर कोलकात्यात ही वाढ २४ रुपयांनी झाली आहे. तर चेन्नईमध्ये २३. ५० रुपयांनी वाढ झाली आहे.

SSC Exam : विद्यार्थ्यांनो ऑल द बेस्ट! राज्यात दहावीची परीक्षा आज पासून,१६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

आज एलपीजीच्या दरांमध्ये ही वाढ अहमदाबाद, मेरठ, दिल्ली, जयपूर, इंदूर, लखनौ, आग्रा, मुंबईसह संपूर्ण देशात झाली आहे. मात्र, केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडर बाबत ही दर वाढ झाली आहे. गेल्या ऑगस्टपासून १४.२ किलो घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर कायम असून यात वाढ झालेली नाही. या मुळे घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना दिलेला दिलासा कायम आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

sharad pawar : ..यामुळे शरद पवारांना ‘नमो महा रोजगार’ मेळाव्याचे निमंत्रण नाही; मात्र आता निमंत्रण पत्रिकाच बदलली!

आज कोणत्या दराने मिळेल सिलिंडर

आज दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १७६९.५० रुपयांऐवजी १७९५ रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये या सिलेंडरची किंमत १८८७ रुपयांऐवजी १९११ रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर १७४९ रुपये झाले आहे आहेत. तर चेन्नईत १९६० रुपयांना व्यवयाईक सिलेंडर मिळणार आहे.

आग्रामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आजपासून १८१७.५ रुपयांऐवजी १८४३ रुपयांना मिळणार आहे. जयपूरमध्ये १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १८१८ रुपयांना मिळणार आहे. लखनऊमध्ये १८८३ रुपयांऐवजी १९०९ रुपयांना व्यावसाईक सिलेंडर मिळणार आहे. अहमदाबादमध्ये १८१६ रुपयांना सिलेंडर मिळणार आहे. तर हा सिलिंडर इंदूरमध्ये १९०१ रुपयांना व्यावसाईक सिलेंडर मिळणार आहे.

घरगुती सिलिंडरचे दर १ मार्च २०२४

घरगुती LPG सिलिंडरची किंमत दिल्लीत ९०३ रुपये आणि कोलकात्यात ९२९ रुपये एवढी आहे. आज १ फेब्रुवारी रोजी मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये आहे. घरगुती सिलिंडरच्या किमती ३० ऑगस्ट २०२३ रोजी बदलण्यात आल्या होत्या. १ मार्च २०२३ रोजी दिल्लीत एलपीजीचा दर प्रति सिलिंडर ११०३ रुपये होता. यानंतर ते एकाच वेळी २०० रुपयांनी स्वस्त करण्यात आले.

WhatsApp channel

विभाग