आजपासून महाग झाला LPG सिलिंडर, दिल्ली ते मुंबई किती रुपयांनी वाढले दर? वाचा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  आजपासून महाग झाला LPG सिलिंडर, दिल्ली ते मुंबई किती रुपयांनी वाढले दर? वाचा

आजपासून महाग झाला LPG सिलिंडर, दिल्ली ते मुंबई किती रुपयांनी वाढले दर? वाचा

Published Mar 01, 2025 09:10 AM IST

LPG Price 1 March 2025: आज म्हणजेच शनिवारी १ मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार अर्थसंकल्पाच्या दिवशी मिळालेला दिलासा आज काढून टाकण्यात आला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

आजपासून महाग झाला LPG सिलिंडर, दिल्ली ते मुंबई किती रुपयांनी वाढले दर? वाचा
आजपासून महाग झाला LPG सिलिंडर, दिल्ली ते मुंबई किती रुपयांनी वाढले दर? वाचा (PTI)

LPG Price 1 March 2025:  सरकारने आज गॅससिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. आज शनिवारी १ मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. एलपीजीच्या (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) नव्या दरानुसार अर्थसंकल्पाच्या दिवशी मिळालेला दिलासा आज काढून घेत सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा धक्का देण्यात आला आहे. आज पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 

आज दिल्लीते मुंबईपर्यंत ही दर वाढ लागू करण्यात आली आहे. तब्बल ६ रुपयांनी हा सिलिंडर  महागला आहे. मात्र, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या मार्चमहिन्यातील किमतीचा कल पाहिला तर १ मार्च रोजी झालेली वाढ ही गेल्या ५ वर्षांतील सर्वात कमी वाढ आहे. इंडियन ऑईल पोर्टलवरील आकडेवारीनुसार, मार्च २०२३  मध्ये व्यावसायिक किंमती सर्वाधिक वाढल्या, जेव्हा किंमती एका झटक्यात ३५२ रुपयांपर्यंत वाढल्या.

मोठी वाढ 

अर्थसंकल्पाच्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ७ ते १९ रुपयांनी कपात करण्यात आली. १  ऑगस्ट २०२४ पासून घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४  किलोएलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

इंडियन ऑईलने जाहीर केलेल्या ताज्या दरानुसार, १  फेब्रुवारीपासून दिल्लीत १९ किलोएलपीजी सिलिंडरची किंमत १८०३ रुपये झाली आहे. यापूर्वी फेब्रुवारीत तो १७९७ रुपये आणि जानेवारीत १८०४ रुपये होता. कोलकात्यात हाच व्यावसायिक सिलिंडर आता १९१३ रुपयांना मिळणार आहे. फेब्रुवारीत तो १९११ रुपयांवरून १९०७ रुपयांवर आणण्यात आला.

मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत आता पुन्हा १७५५.५० रुपये झाली आहे. फेब्रुवारीत तो १७४९.५० रुपये आणि जानेवारीत १७५६ रुपये होता. कोलकात्यात १९  किलोच्या निळ्या सिलिंडरच्या दरातही बदल झाला आहे. याची किंमत येथे १९६५.५० रुपये आहे. फेब्रुवारीत तो १९५९.५० रुपये आणि जानेवारीत १९६६ रुपये होता.

दिल्लीतील व्यावसायिक सिलिंडरच्या मार्च किंमतीचा कल

०१-मार्च-२०२५  १८०३ 

०१  फेब्रुवारी २०२५  १७९७ 

वाढ: 6

रुपये ०१ -मार्च-२०२४  १७९५ 

०१ -फेब्रुवारी २०२४  १७६९.५  

वाढ: २५.५ 

०१-मार्च-२०२३   २११९.५ 

०१-फेब्रुवारी-२०२३  १७६९ 

वाढ

१० मार्च-२०२२  १०२ 

वाढ : ९५  रुपये

स्त्रोत : इंडियन ऑईल

फेब्रुवारी २०२१ मध्ये सिलिंडरच्या किंमतीत ४ वेळा बदल करण्यात आला होता.  

दिल्लीत १४  किलोचा एलपीजी सिलिंडर १  ऑगस्टइतकाच दर मिळत आहे. आज, १  मार्च २०२५ रोजी तो ८०३  रुपयांना विकला जात आहे. तर लखनौमध्ये १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ८४०.५०  रुपये आणि १९  किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १९१८ रुपये आहे. कोलकात्यात एलपीजी सिलिंडरची किंमत ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५०  रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५०  रुपये आहे.

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner