सर्वसामान्यांना सरकारचं न्यू इयर गिफ्ट! एलपीजी गॅस सिलेंडर तब्बल १४.५० रुपयांनी स्वस्त, ‘असे’ आहेत नवे दर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सर्वसामान्यांना सरकारचं न्यू इयर गिफ्ट! एलपीजी गॅस सिलेंडर तब्बल १४.५० रुपयांनी स्वस्त, ‘असे’ आहेत नवे दर

सर्वसामान्यांना सरकारचं न्यू इयर गिफ्ट! एलपीजी गॅस सिलेंडर तब्बल १४.५० रुपयांनी स्वस्त, ‘असे’ आहेत नवे दर

Jan 01, 2025 09:34 AM IST

LPG Price 1 January 2025: सरकारने नागरिकांना दिलासा देत नवीन वर्षाची खास भेट दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढत होत्या. मात्र, आजपासून एलपीजी गॅस १४.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे.

LPG Price 1 January: एलपीजी सिलेंडर हुआ सस्ता, नए साल की पहली सुबह राहतभरी खबर
LPG Price 1 January: एलपीजी सिलेंडर हुआ सस्ता, नए साल की पहली सुबह राहतभरी खबर (HT)

LPG Price 1 January 2025 : नवीन वर्षाची सकाळ एलपीजी ग्राहकांना दिलासा देणारी ठरली आहे. एलपीजी सिलिंडर आजपासून १४.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. सिलिंडरच्या दरात झालेली ही कपात  संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. ही दर कपात १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये झाली आहे.  घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४  किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मुंबईत इतक्या रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर 

मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात १६ रुपयांनी घट झाली आहे. येथे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरून १७७१ रुपयांऐवजी १७५६ रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीत आज १ जानेवारीपासून १९ किलोचा इंडेन एलपीजी सिलिंडर १८०४  रुपयांना मिळणार आहे. गेल्या महिन्यात हा सिलेंडर  १८१८.५० रुपये एवढ्या किमतीला विकला जात होता. कोलकात्यात हा व्यावसायिक सिलिंडर आता १९११ रुपये झाला आहे. डिसेंबरमध्ये तो १९२७ रुपये होता. नोव्हेंबरमध्येही तो १९११.५० रुपये होता. कोलकात्यात याची किंमत १ जानेवारीपासून १९८०.५० रुपयांवरून १९६६ रुपये करण्यात आली आहे. पाटण्यात हाच सिलिंडर आता २०७२.५ रुपयांऐवजी २०५७ रुपयांना मिळणार आहे.

२०२५ वर्षात घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही 

वर्ष २०२५ च्या सुरवातीला  घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजही मुंबईत घरगुती सिलेंडर हा ८०२.५०  रुपयांना तर  चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना हा सिलेंडर मिळतो.  पाटण्यात ८९२.५०,  दिल्लीत १४ किलोचा एलपीजी सिलिंडर ८०३  रुपयांना विकला जात आहे. कोलकात्यात एलपीजी सिलिंडरची किंमत ८२९  रुपये आहे. 

वर्ष 2024 व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर

 १  डिसेंबर १८१८.५० 

१  नोव्हेंबर १८०२ 

१ ऑक्टोबर १७४० 

१ सप्टेंबर १६९१.५० 

१  ऑगस्ट १६५२.५० 

१  जुलै १६४६ 

१  जून १६७६  

१  मे १७४५.५०  

१ एप्रिल १७६४.५० 

१  मार्च १७९५  

१ फेब्रुवारी १७६९.५०  

१  जानेवारी १७५५.५० . 

 

Whats_app_banner