LPG Cylinder New Rates: आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मात्र, त्याआधीच महागाईचा सामना करत असलेल्या सर्वसामन्यांना दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात ७ रुपयांनी कपात करण्यात आली. ही कपात फक्त १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी असेल. दरम्यान, १ ऑगस्ट २०२४ पासून घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
इंडियन ऑईलने जाहीर केलेल्या ताज्या दरानुसार, दिल्लीत १ फेब्रुवारीपासून १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १ हजार ७९७ रुपये झाली आहे. जानेवारी महिन्यात या सिलिंडरसाठी १ हजार ८०४ रुपये मोजावे लागत होते. कोलकात्यात हाच व्यावसायिक सिलिंडर आता १ हजार ९११ रुपयांऐवजी १ हजार ९०७ रुपयांना मिळणार आहे.
मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत आता १ हजार ७४९.५० रुपये झाली आहे. मुंबईत जानेवारीत हा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १ हजार ७५६ रुपयांना मिळत होता. कोलकात्यात १९ किलोच्या निळ्या सिलिंडरच्या दरातही बदल झाला आहे. त्याची किंमत आता १ हजार ९६६ रुपयांऐवजी १ हजार ९५९.५० रुपये करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प २०२५ च्या दिवशीही घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत १४ किलोचा एलपीजी सिलिंडर १ ऑगस्टइतकाच दर मिळत आहे. दिल्लीत आज घरगुती एलपीजी सिलिंडर ८०३ रुपयांना विकला जात आहे. तर, लखनौमध्ये १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ८४०.५० रुपये आणि १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १ हजार ९१८ रुपये आहे. कोलकात्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहे.
१ जानेवारी २०२४: १ हजार ७५५.५० रुपये
१ फेब्रुवारी २०२४: १ हजार ७६९.५० रुपये
१ मार्च २०२४: १ हजार ७९५ रुपये
१ एप्रिल २०२४: १ हजार ७६४.५० रुपये
१ मे २०२४: १ हजार ७४५.५० रुपये
१ जून २०२४: १ हजार ६७६ रुपये,
१ जुलै २०२४: १ हजार ६४६ रुपये,
१ ऑगस्ट २०२४: १ हजार ६५२.५० रुपये,
१ सप्टेंबर २०२४: १ हजार ६९१.५० रुपये,
१ ऑक्टोबर २०२४: १ हजार ७४० रुपये,
१ नोव्हेंबर २०२४: १ हजार ८०२ रुपये,
१ डिसेंबर २०२४: १ हजार ८०२ रुपये.
संबंधित बातम्या