Best Selfie Camera Phones: सेल्फी आणि रील बनवण्यासाठी चांगला फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. कमी बजेटमध्ये चांगला सेल्फी कॅमेरा फोन घ्यायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक लिस्ट तयार केली आहे. या यादीमध्ये १५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सर्वोत्कृष्ट सेल्फी कॅमेऱ्यांचा समावेश आहे.
रेडमी १३ मध्ये १२० हर्ट्झ डिस्प्लेसह ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट सेल्फीसाठी रेडमी १३ मध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स आणि १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ३३ वॅट फास्ट चार्जिंगसह ५०३० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. अॅमेझॉनवर हा फोन १२ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.
मोटोरोला जी ४५ मध्ये ६.८ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सेलप्रायमरी लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी याचा १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उत्तम पर्याय आहे. फोनमध्ये १२ वॅट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. अॅमेझॉनवर हा फोन ११ हजार ९९० रुपयांना उपलब्ध आहे.
पोको एक्स ६ निओ 5G फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आणि ड्युअल रियर कॅमेरासह येतो, ज्यावर १०८ एमपी मुख्य लेन्स आहे. सेल्फीसाठी याचा १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उत्तम आहे. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर १२ हजार ९९९ रुपये.
सीएमएफ फोन १ मध्ये ६.६७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे आणि ५० एमपी ड्युअल रियर कॅमेरा आणि १६ एमपी फ्रंट कॅमेरासह उच्च-गुणवत्तेचे फोटो वितरित करण्यासाठी डिझाइन केले आहे. यात ५००० एमएएचची बॅटरी आणि ३३ वॅट फास्ट चार्जिंग आहे. अॅमेझॉनवर हा फोन 14,999 रुपयांना उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एफ १५ मध्ये ६.६७ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, तो सेल्फीसाठी परफेक्ट आहे. फोनमध्ये २५ वॅट चार्जिंगसह ६००० एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर हा फोन १४ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.