Interest rates Hike : ‘या’ चार बॅकांची कर्जे महागली, नवे दर तात्काळ लागू
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Interest rates Hike : ‘या’ चार बॅकांची कर्जे महागली, नवे दर तात्काळ लागू

Interest rates Hike : ‘या’ चार बॅकांची कर्जे महागली, नवे दर तात्काळ लागू

Updated Nov 02, 2022 01:52 PM IST

Bank Interest rates Hike: आरबीआयच्या बैठकीच्या दोन दिवस आधी या चार बॅकांनी त्यांच्या एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. ही वाढ त्वरित लागू करण्यात आली आहे.

rate of interest HT
rate of interest HT

Bank Interest rates Hike : आरबीआयची ३ नोव्हेंबरला बैठक होणार आहे. याच्या दोन दिवस आधी चार मोठ्या बँकांनी आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकेने एमसीएलआर (MCLR) वाढवला आहे. नवे दर १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

MCLR दराने बँका कमी दराने कर्ज देऊ शकत नाहीत. याची सुरुवात आरबीआयने २०१६ मध्ये केली होती. आरबीआयने या वर्षी मे पासून चार वेळा रेपोमध्ये १.९० टक्क्यांनी वाढ केली आहे. एप्रिलपर्यंत ६.६० टक्के दराने मिळणारे कर्ज आता किमान ८ टक्के दराने उपलब्ध आहे.

आयसीआयसीआय (ICICI) बँक: बॅकेने एमसीएलआरमध्ये ०.२० टक्क्यांनी वाढ केली आहे. एक वर्षाचा हा दर आता ८.३० टक्के असेल, जो पूर्वी ८.१० टक्के होता.

पंजाब नॅशनल बँक: एमसीएलआर ०.३० टक्क्यांनी वाढवला आहे. यासह, एक वर्षाचा दर आता ८.०५ टक्के होईल, जो पूर्वी ७.७५ टक्के होता. तीन वर्षांचा दर ८.०५ वरून ८.३६ टक्के झाला आहे.

बँक ऑफ इंडिया: त्यात ०.१५ टक्के वाढ झाली आहे. एक वर्षाचा एमसीएलआर दर आता ७.९५ टक्के असेल जो पूर्वी ७.८० टक्के होता.

इंडियन बँक : बँकेने एक दिवसीय एमसीएलआर ०.३५ टक्क्यांनी वाढवून ७.४० टक्के केला आहे.

एका वर्षात किरकोळ कर्ज दरात तेजी

बॅंकांच्या एकूण कर्जामध्ये किरकोळ कर्जाचा वाटा २९ टक्के आहे. यापैकी बहुतांश गृहनिर्माण आणि वाहन कर्जे आहेत. वर्षभरापूर्वी त्याचा वाटा १३.२ टक्के होता. सेवा क्षेत्रावरील पत सप्टेंबरमध्ये २० टक्क्यांनी वाढली, जी एका वर्षापूर्वी केवळ १.२ टक्क्यांनी वाढली होती.

 

Whats_app_banner