
Chanda Kochar fraud case : सीबीआयने शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना कर्ज फसवणूक प्रकरणी अटक केली. चंदा कोचर यांनी बँकेच्या धोरण आणि नियमांच्या विरोधात जाऊन कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिल्याचा आरोप आहे.
२६ ऑगस्ट २००९ रोजी व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला ३०० कोटी रुपये आणि ३१ ऑक्टोबर २०११ रोजी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला ७५० कोटी रुपयांचे कर्ज वितरण बॅकेने चंदा कोचर यांच्या समितीअंतर्गत मंजूर केले होते. या आरोपांनंतर चंदा कोचर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि एमडी पदाचा राजीनामा दिला.
संबंधित बातम्या
