मराठी बातम्या  /  Business  /  Likely To Miss Monthly Repayment Dont Worry Sbi Will Send You A Chocolate Check Details

EMI न भरल्यास SBI करणार गांधीगिरी; ग्राहकाला चॉकलेट पाठवून हप्ता भरण्याची करून देणार आठवण

SBI HT
SBI HT
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
Sep 18, 2023 09:44 AM IST

SBI Chocolate Scheme : कर्जाचे हप्ते वेळेवर न भरणाऱ्या ग्राहकांविरोधात भन्नाट उपाय काढला आहे. एसबीआय आता गांधीगिरीचा मार्ग अवलंबवत कर्ज थकवणाऱ्या ग्राहकांना थेट चॉकलेट पाठवून ईएमआय भरण्याची आठवण करुन देणार आहे.

SBI New Initiative : देशात एसबीआय कर्ज देणारी मोठी बँक आहे. दरवर्षी हजारो नागरिक कर्ज घेत असतात. मात्र, त्यातील काही नागरिक हे कर्जबुडवे असतात. काही जाणीव पूर्वक तर काही आर्थिक अडचणीमुळे हप्ते भरू शकत नाही. त्यामुळे जर ग्राहकांचा जर एखादा हप्ता चुकलं तर एसबीआय गांधीगिरीचे धोरण अवलंबवणार आहे. एसबीआयचे अधिकारी हप्ता न भरणाऱ्या ग्राहकांना आता चॉकलेट पाठवणार आहे. या सोबत त्यांना हप्ता भरण्याची आठवण देखील करून देणार आहेत. एसबीआयच्या म्हणण्यानुसार, कर्ज न फेडण्याच्या विचारात असणारे कर्जदार बँकेने अनेकदा स्मरण करूनही प्रतिसाद देत नाहीत. अशा परिस्थितीत कर्जदाराला न कळवता चॉकलेट घेऊन त्याच्याकडे जाणे हा एक चांगला पर्याय आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जदारांकडून, विशेषतः किरकोळ ग्राहकांकडून मासिक हप्ते (EMI) वेळेवर भरण्याची खात्री करण्यासाठी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. जे ग्राहक बँकेच्या कर्जाचे हप्ते पूर्ण भरत नाही अशा कर्जदाराला न कळवता बँकेचे अधिकारी त्यांच्या दरात थेट चॉकलेट घेऊन पोहचणार आहेत. .

एकीकडे बँकिंग क्षेत्रात रिटेल कर्ज घेण्यात तेजी आली आहे. तसेच हप्ते चुकवण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे कर्ज वसूली संदर्भात बँकेने हे पाऊल उचलले आहे. एसबीआयची ही चॉकलेट योजना देखील वसुली सुनिश्चित करणार आहे.

एसबीआयचे अधिकारी अश्विनी कुमार तिवारी म्हणाले, या साठी बँकेने दोन फिनटेक कंपन्याशी करार केला असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरून काही किरकोळ कर्जदारांना त्यांच्या कर्ज भरण्याची आठवण करून दिली जाणार आहे. एक कंपनी आठवण तर दुसरी कंपनी जे ग्राहक हप्ते भरत नाहीत त्यांच्याबाबत सावध करणार आहेत. यानंतर अधिकारी अशा ग्राहकांचीहा घरी जाऊन त्यांना चॉकलेटचे पॅकेट देऊन हप्ते भरण्याची आठवण करून देणार आहे. या माध्यमातून कर्ज भरण्याचे प्रमाण वाढले असल्याचे देखील बँकेने म्हंटले आहे. या दोन कंपन्यांचे नाव देण्यास नकार देताना तिवारी म्हणाले की, ही मोहीम सध्या प्रयोगीग तत्वावर राबवली जात आहे. गेल्या १५ दिवसांपासूंन हा उपक्रम सुरू आहे. जर ही मोहीम यशस्वी झाली, तर आम्ही याची अधिकृत घोषणा करू असे देखील तिवारी म्हणाले.

SBI च्या किरकोळ कर्जाच्या तपशिलांमध्ये SBI चे Sutter Zone वाटप जून २०२३ पासून १ हजार ८४६ टक्क्यांनी वाढून ते १२०४.२७९ कोटी झाले आहे, मागील वर्षीच्या १९०,३४,११४ कोटींच्या तुलनेत. बॅंकेचे एकूण कर्ज खाते १३.९ टक्क्यांनी वाढले आहे. ते ३३,०८,७३१ कोटी रुपये एवढे झाले आहे.

विभाग