मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC raised stake in Tata : एलआयसीने टाटाच्या ‘या’ कंपनीत वाढवला हिस्सा

LIC raised stake in Tata : एलआयसीने टाटाच्या ‘या’ कंपनीत वाढवला हिस्सा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 08, 2022 08:58 AM IST

एलआयसीने व्होल्टासमधील आपला हिस्सा ८.८८४% पर्यंत वाढवला आहे. याआधी एलआयसीचा कंपनीत सुमारे ६.८६२ टक्के हिस्सेदारी होती.

LIC HT
LIC HT

एलआयसीने व्होल्टासमधील आपला हिस्सा ८.८८४% पर्यंत वाढवला आहे. याआधी एलआयसीची कंपनीत सुमारे ६.८६२ टक्के हिस्सेदारी होती.

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) होम अप्लायन्स आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी व्होल्टासमधील (Voltas) आपला हिस्सा वाढवला आहे. एलआयसीने सोमवारी एक्सचेंजेसना सांगितले की त्यांनी व्होल्टासमधील आपला हिस्सा ८.८८४% पर्यंत वाढवला आहे. याआधी एलआयसीची कंपनीत सुमारे ६.८६२ टक्के हिस्सेदारी होती.

कंपनीने काय म्हटले?

नियामक फाइलिंगनुसार, व्होल्टासमधील शेअरहोल्डिंग पूर्वीच्या २,२७,०४,३०६ इक्विटी शेअर्सच्या तुलनेत २.०२% ने वाढून २,९३,९५,२२४ इक्विटी शेअर्सवर पोहोचले आहे. एलआयसीने सांगितले की, १० ऑगस्ट ते ४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत व्होल्टासमधील हिस्सेदारी २% ने वाढली आहे. हे पेमेंट व्होल्टासमध्ये खुल्या बाजारातील खरेदीच्या स्वरूपात प्रति शेअर सरासरी ९४८.३१ या दराने केले गेले.

व्होल्टास आणि एलआयसीचे शेअर्स

४ नोव्हेंबर रोजी व्होल्टासचे शेअर्स सुमारे ८४४.८५ होते. तर ७ नोव्हेंबर रोजी बीएसईवर शेअर्स १.२४% घसरून ८३४.४० वर आले. व्होल्टासचे मार्केट कॅप अंदाजे २७,६०९ कोटी आहे.

दरम्यान, एलआयसीचे शेअर्स बीएसईवर ०.८४% ​​वाढून ६३३.३० वर बंद झाले. एलआयसी भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे. तिचे बाजार भांडवल 4 लाख कोटींहून अधिक आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग