सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) महानगर गॅसमधील (एमजीएल) आपला हिस्सा कमी केला आहे. एलआयसीने हे शेअर्स 1521.31 रुपये प्रति शेअरदराने विकले आहेत. ज्यामुळे कंपनीला ३१४ कोटी रुपये मिळाले आहेत. महानगर गॅस लिमिटेडमधील एलआयसीचा हिस्सा ९.०३ टक्क्यांवरून ६.९४ टक्क्यांवर आला आहे. एलआयसीने एकूण ६८.५४ लाख शेअर्सची विक्री केली आहे.
शुक्रवारी महानगर गॅस लिमिटेडचा शेअर जवळपास १ टक्क्यांनी घसरून १९४६.४५ रुपयांवर बंद झाला. याआधी कंपनीचे शेअर्स 1972.50 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचण्यात यशस्वी ठरले होते.
महानगर गॅस लिमिटेडच्या शेअरच्या किमतीत गेल्या वर्षभरात ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत या शेअरने ६१ टक्के परतावा दिला आहे. तर निफ्टी ५० मध्ये या काळात २० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
जून तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल १७०१.४० कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वी कंपनीचा महसूल १८८७.१० कोटी रुपये होता. कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर १० टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, मार्च तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात वाढ झाली आहे.
एप्रिल ते जून 2024 या कालावधीत महानगर गॅस लिमिटेडचा नफा 288.80 कोटी रुपये झाला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात २२ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा एकूण नफा ३६८.४० कोटी रुपये होता. तर जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत महानगर गॅस लिमिटेडला 252.30 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
(हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.