भारतीय आयुर्विमा महामंडळाशी (एलआयसी) संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच एलआयसी आरोग्य विमा क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. रंजन पै यांच्या मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्समधील महत्त्वपूर्ण अल्पांश हिस्सा खरेदी करण्यासाठी एलआयसी अटींना अंतिम रूप देत असल्याचे वृत्त आहे. झपाट्याने वाढणाऱ्या देशांतर्गत आरोग्य विमा बाजारात कंपनीचा प्रवेश आहे. दरम्यान, एलआयसीचा शेअर गुरुवारी किरकोळ वाढीसह ७९१.३० रुपयांवर व्यवहार करत आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्समधील 40-49% हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. एलआयसीचे मोठे वितरक नेटवर्क आणि आर्थिक ताकद पाहता नवीन भांडवल गुंतवणूक आणि काही दुय्यम समभाग विक्रीचा समावेश असलेल्या या करारामुळे बाजारात चांगलीच खळबळ उडण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की या निर्णयामुळे एलआयसीला देशातील 3 लाख कोटी रुपयांच्या सामान्य विमा बाजारात 37% वाटा असलेल्या विभागाचा फायदा घेता येईल.
अलीकडेच एलआयसीचे मुख्य कार्यकारी सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले होते की, येत्या दोन आठवड्यांत एलआयसी एका आरोग्य विमा कंपनीतील हिस्सा खरेदी करेल. मोहंती म्हणाले की, एलआयसी आरोग्य विमा कंपनीशी चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहे आणि 31 मार्चपूर्वी अंतिम घोषणा होण्याची अपेक्षा आहे. एलआयसीने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत अहवाल दिला होता की ते आरोग्य विमा व्यवसायात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीमध्ये हिस्सा खरेदी करू इच्छित आहेत.
संबंधित बातम्या