LIC on whatsapp : एलआयसी आता व्हॉट्सॲपवर; तुम्हाला कसा होणार फायदा?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC on whatsapp : एलआयसी आता व्हॉट्सॲपवर; तुम्हाला कसा होणार फायदा?

LIC on whatsapp : एलआयसी आता व्हॉट्सॲपवर; तुम्हाला कसा होणार फायदा?

Dec 06, 2022 04:06 PM IST

LIC on whatsapp : एलआयसीच्या अधिकृत निवेदनानुसार, ज्या पाॅलिसीधारकांनी पाॅलीसीची नोंदणी आँनलाईन केलेली आहे, त्यांनाच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी आपली पाॅलिसीची नोंदणी केलेली नाही त्यांनी ती तात्काळ करुन घेणे आवश्यक आहे.

LIC whatsapp HT
LIC whatsapp HT

LIC on whatsapp : एलआयसीच्या अधिकृत निवेदनानुसार, ज्या पाॅलिसीधारकांनी पाॅलीसीची नोंदणी आँनलाईन केलेली आहे, त्यांनाच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी आपली पाॅलिसीची नोंदणी केलेली नाही त्यांनी ती तात्काळ करुन घेणे आवश्यक आहे.

सध्या बड्या बॅका, सरकारी संस्थांसह विमा कंपन्यांनीही व्हाॅटसअॅपवर आपली सेवा देण्याची तयारी जलदरित्या सुरु केली आहे. यात स्पर्धेत आता लाईफ इन्शुअरन्स लिमिटेड अर्थात एलआयसीनेही उडी घेतली आहे. एलआयसीने त्यांच्या पाॅलिसीधारकांसाठी व्हाॅट्सअॅपसेवा दाखल केली आहे. ज्या पाॅलिसीधारकांनी एलआयसीच्या आॅनलाईन पोर्टलवर त्यांची पाॅलिसी नोंदणीकृत केली आहे, त्यांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

या पाॅलिसीधारकांना एलआयसीच्या अधिकृत व्हाॅट्सॅप चॅटबाॅक्सच्या माध्यमातून प्रिमियम डिटेल्स, युलिप प्लान्सचे स्टेटमेंट्स यांसह अनेक अप़डेट्स घरबसल्या मिळणार आहेत.त्यामुळे ज्या पाॅलिसीधारकांनी आपले नाव आँनलाईन पोर्टलवर नोंदणीकृत केलेले नाही, त्यांच्यासाठी ते करणे अनिवार्य असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. अन्यथा या सेवेचा लाभ त्यांना घेता येणार नाही. जाणून घ्या कशा प्रकारे तुम्ही एलआयसी व्हाॅट्सअॅप सेवेचा लाभ धेऊ शकता, ती प्रक्रिया पुढीलप्रमाणे -

- सगळ्यात आधी एलआय़सीचा अधिकृत व्हाॅट्सअॅप नंबर ८९७६८६२०९० तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा.

- त्यानंतर एलआयसी आॅफ इंडिया व्हाॅट्सअॅप चॅट बाॅक्स ओपन करुन त्यात 'हाय' असा मेसेज लिहा.

- या चॅटबाॅक्समध्ये एलआयसीतर्फे ११ विकल्प येतील

- यात तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा. जसे की, प्रिमियम डेट, बोनस इन्फाॅर्मेशन, इत्यादी.

- पर्याय निवडल्यानंतर एलआयसी चॅट बाॅक्समध्ये आपल्याला हवे असणारी संबंधित माहिती शेअर करेल.

एलआयसी पाॅलिसी आँनलाईन पोर्टलवर अशी करा रजिस्टर्ड

- सगळ्यात आधी एलआयसी इंडियाच्या संकेतस्थळाला भेट द्या

- त्यात कस्टमर पोर्टलवर क्लिक करा

- जर तुम्ही नवीन सदस्य असाल तर 'न्यू युजर्स' वर क्लिक करुन संबंधित माहिती भरा

- जर तुमच्याकडे आधीच युजर आयडी आणि पासवर्ड असेल तर त्याप्रमाणे संबंधित माहिती भरा

- आता 'बेसिक सर्व्हिसेस' अंतर्गत 'अॅड पाॅलिसी' करुन आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

 

Whats_app_banner