Bonus Share : एलआयसीची तगडी गुंतवणूक असलेली कंपनी देतेय बोनस, तारीख जाहीर-lic backed penny stock integra essentia sets record date for issuance of 1 1 bonus shares ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bonus Share : एलआयसीची तगडी गुंतवणूक असलेली कंपनी देतेय बोनस, तारीख जाहीर

Bonus Share : एलआयसीची तगडी गुंतवणूक असलेली कंपनी देतेय बोनस, तारीख जाहीर

Jan 01, 2024 03:12 PM IST

Integra Essentia Bonus Share : इंटिग्रा इसेन्शिया या स्मॉल कॅप कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना खूशखबर दिली आहे.

Integra Essentia
Integra Essentia

Integra Essentia bonus share record date : भारतीय आर्यर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीची मोठी गुंतवणूक असलेली इंटिग्रा एसेन्शिया लिमिटेड या कंपनीनं बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली. त्यानुसार, बोनस शेअरसाठी ११ जानेवारी २०२४ ही रेकॉर्ड तारीख असेल. 

इंटिग्रा इसेन्शिया या स्मॉल कॅप कंपनीनं तिच्या पात्र भागधारकांना १:१ या प्रमाणात बोनस जाहीर केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ४२ नुसार, कंपनीनं बोनस शेअरसाठी गुरुवार, ११ जानेवारी २०२४ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. कंपनीच्या निर्णयानुसार प्रत्येक भागधारकाला एका शेअरवर एक बोनस शेअर दिला जाणार आहे.

२० हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच 'महारत्न' कंपनीचा शेअर उसळला, तुमच्याकडं आहे का?

इंटिग्रामध्ये एलआयसीची गुंतवणूक किती?

इंटिग्रा इसेन्शियाच्या जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, एलआयसीकडं इंटिग्राचे ४८,५९,९१६ शेअर आहेत. हा आकडा कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलच्या १.०६ टक्के आहे.

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग