LIC Adani : ही दोस्ती तुटायची नाय! अदानी समूहावर एलआयसीचा भरवसा, पुन्हा खरेदी केले लाखो शेअर्स-lic again expressed confidence in adani company bought lakhs of shares of this company ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC Adani : ही दोस्ती तुटायची नाय! अदानी समूहावर एलआयसीचा भरवसा, पुन्हा खरेदी केले लाखो शेअर्स

LIC Adani : ही दोस्ती तुटायची नाय! अदानी समूहावर एलआयसीचा भरवसा, पुन्हा खरेदी केले लाखो शेअर्स

Apr 11, 2023 05:26 PM IST

LIC hikes stake Adani stocks : सरकारी विमा कंपनी एलआयसीने अदानी समूहातील कंपन्यांवरील विश्वास कायम ठेवला आहे. एलआयसीने अदानी एन्टरप्राईजेसचे लाखो शेअर्स मार्च तिमाहीदरम्यान खरेदी केले आहेत.

LIC Adani HT
LIC Adani HT

LIC hikes stake in Adani stocks : हिडेनबर्ग अहवालाचा फुगा आता फुस्स होताना दिसत आहे. हिडेनबर्गने अदानी समूहाचा पाया हलवला होता. रिपोर्ट आल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. एकीकडे गुंतवणूकदार तर दुसरीकडे संसदेतही हा मुद्दा चांगलाच गाजला. यादरम्यान एलआयसी कंपनीची अदानी समूहातील गुंतवणूकीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र एलआयसीने अदानी समूहावरील आपला विश्वास कायम ठेवला आहे. यामुळेच अदानी एन्टरप्राईजेसचे लाखो शेअर्स मार्च तिमाहीदरम्यान खरेदी केले आहेत.

अदानी एन्टरप्राईजेसमध्ये एलआयसीचा हिस्सा आता किती

एलआयसीने गेल्या आर्थिक वर्षाच्य शेवटच्या तिमाहीत अदानी एन्टरप्राईजेसचे ३,५७,५०० शेअर्स खरेदी केले होते. या खरेदीनंतर अदानी एन्टरप्राईजेसमध्े एलआयसीचा हिस्सा वाढून ४.२६ टक्के झाला आहे.

छोट्या गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला

केवळ एलआयसीच नाही तर अदानी एन्टरप्राईजेजवर रिटेल गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक २ लाख रुपये आहे त्यांचाही कंपनीतील हिस्सा ३ पट वाढला आहे. रिटेल गुंतवणूकदारांची अदानी एन्टरप्राईजेसमधील हिस्सेदारी वाढून ३.४१ टक्के झाली आहे. डिसेंबर तिमाहीपर्यंत अदानी एन्टरप्राईजेसमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा हिस्सा अंदाजे १.८६ टक्के होता. 

अदानी एन्टरप्राईजेसशिवाय अदानी ग्रीन्समधील रिटेल गुंतवणूकदारांची हिस्सेदारी १.०६ टक्क्यांनी वाढून २.३३ टक्के झाली आहे. अदानी पोर्ट्समध्ये २.८६ टक्क्यानी वाढून ४.१ टक्के, अम्बुजा सिमेंटमध्ये ५.५२ टक्क्यांवरुन ७,२३ टक्के, एनडीटीव्हीमध्ये १४.११ टक्क्यांनी वाढून १७.५४ टक्के झाली आहे. याशिवाय अदानी ट्रान्समिशनमध्ये ०.७७ टक्के हिस्सा वाढून १.३६ टक्के, अदानी विल्मरमधील हिस्सा ८.९४ टक्क्यांनी वाढून ९.४९ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा १.५५ टक्के हिस्सा वाढून मार्च मार्च तिमाहीत २,३९ टक्के झाला आहे.

या कंपन्यांमध्येही पुन्हा एलआयसीची गुंतवणूक

अदानी एन्टरप्राईजेसशिवाय एलआयसीने अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅसमध्येही आपला हिस्सा वाढवला आहे. दरम्यान मार्च तिमाहीत अदानी पोर्ट्स, एसीसी, अंम्बुजा सिमेंट्समधील हिस्सा विक्री केली आहे.

संबंधित बातम्या