एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओ : दक्षिण कोरियातील एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंक ला आपला भारतीय व्यवसाय शेअर बाजारात सूचीबद्ध करायचा आहे. यासाठी कंपनी आता इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) लाँच करण्याच्या तयारीत आहे. या माध्यमातून १.५ अब्ज डॉलर ्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कंपनी पुढील महिन्याच्या सुरुवातीला आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडे प्रॉस्पेक्टस दाखल करण्याची शक्यता आहे.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, कंपनीने आपल्या भारतीय युनिटच्या संभाव्य लिस्टिंग प्लॅनसाठी बँकांची निवड केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या संभाव्य लिस्टिंग योजनेसाठी एलजीने बँक ऑफ अमेरिका कॉर्प, सिटीग्रुप इंक, जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी आणि मॉर्गन स्टॅनली या बँकांची बँकर म्हणून निवड केली आहे.
रिपोर्टनुसार, एलजी शेअर्स विक्रीतून 1-1.5 अब्ज डॉलर ्स उभारण्याचा विचार करू शकते, ज्यामुळे एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मूल्यांकन सुमारे 13 अब्ज डॉलर ्स होईल. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया ही दक्षिण कोरियातील एलजी इलेक्ट्रॉनिक्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, एचव्हीएसी आणि आयटी हार्डवेअर अशा विविध क्षेत्रांमध्ये हा एक प्रस्थापित ब्रँड आहे.
अमेरिकेनंतर एलजी इलेक्ट्रॉनिक्ससाठी भारत ही दुसरी मोठी बाजारपेठ आहे. एलजीचे सध्या रांजणगाव, पुणे आणि ग्रेटर नोएडा येथे दोन उत्पादन युनिट आहेत.
ह्युंदाई मोटर इंडिया (एचएमआयएल) ही दक्षिण कोरियन कार कंपनीची भारतीय युनिटदेखील आयपीओच्या तयारीत आहे. कोरियन वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर कंपनीच्या (एचएमसी) गुरुग्राममुख्यालय असलेल्या स्थानिक उपकंपनीने आपल्या प्रवर्तकाचा हिस्सा कमी करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा (डीआरएचपी) मसुदा नुकताच दाखल केला आहे.