LED TV Under 9000: ८ ते ९ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करा दमदार एलईडी टीव्ही
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LED TV Under 9000: ८ ते ९ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करा दमदार एलईडी टीव्ही

LED TV Under 9000: ८ ते ९ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करा दमदार एलईडी टीव्ही

Dec 16, 2024 10:41 AM IST

Massive Discount on LED TV: बाजारात आठ ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान अशा दमदार एलईडी टीव्ही उपलब्ध आहेत, ज्यात उत्तम डिस्प्ले, डॉल्बी साउंड आणि बेजललेस डिझाइन पाहायला मिळते.

८ ते ९ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करा दमदार एलईडी टीव्ही
८ ते ९ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करा दमदार एलईडी टीव्ही

Smart TV Under 9000: जर तुम्ही ८ ते ९ हजार रुपयांच्या रेंजमध्ये बेस्ट फीचर्स असलेला एलईडी स्मार्ट टीव्ही शोधणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. बाजारात अशा काही एलईडी टीव्ही उपलब्ध आहेत, ज्यात उत्तम डिस्प्ले, डॉल्बी साउंड आणि बेजललेस डिझाइन पाहायला मिळते आणि त्यांची किंमत १० हजारांपेक्षा कमी आहे. या यादीत इनफिनिक्स, टीसीएल आणि थॉमसनच्या टीव्हीचा समावेश आहे.

१) इनफिनिक्स ८० सेमी (३२ इंच)

हा इनफिनिक्स टीव्ही फ्लिपकार्टवर ८ हजार ४९९ रुपयांना उपलब्ध आहे. टीव्हीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला १३६६×७६८ पिक्सल रिझोल्यूशनअसलेला एचडी रेडी डिस्प्ले देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये देण्यात येणारा हा डिस्प्ले ६० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याचे साऊंड आउटपुट १६ वॅट आहे. ट्रू बेजल-लेस फ्रेम असलेला हा टीव्ही लिनक्स ओएसवर काम करतो. टीव्हीची ब्राइटनेस लेव्हल २५० निट्सपर्यंत आहे. क्वाड कोर प्रोसेसरवर काम करणाऱ्या या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, २ एचडीएमआय आणि १ यूएसबी पोर्ट आहे.

२) टीसीएल एल ४ बी ७९.९७ सेमी (३२ इंच)

हा टीव्ही फ्लिपकार्टवर ८ हजार ९९० रुपयांच्या किंमतीसह लिस्ट झाला आहे. टीव्हीमध्ये कंपनी एचडीआर १० सह एचडी रेडी डिस्प्ले देत आहे. हा टीव्ही उत्तम मेटॅलिक बेजल-लेस डिझाइनसह येतो. यात तुम्हाला १६ वॅटचा ऑडिओ मिळेल. डॉल्बी ऑडिओ टीव्हीची साउंड क्वालिटी अधिक जबरदस्त बनवते. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी या टीव्हीमध्ये दोन एचडीएमआय, एक यूएसबी २.० सह सर्व स्टँडर्ड ऑप्शन देत आहे.

३) थॉमसन अल्फा ८० सेमी (३२ इंच)

आपण हा टीव्ही ८ हजार ४९९ रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता. फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी या टीव्हीमध्ये १३६६×७६८ पिक्सल रिझोल्यूशनसह एचडी रेडी डिस्प्ले देत आहे. हा टीव्ही क्वाड-कोर प्रोसेसरवर काम करतो. याचे साऊंड आउटपुट ३० वॅट आहे. यात तुम्हाला बिल्ट-इन वाय-फाय आणि मिराकास्ट देखील मिळेल. टीव्हीच्या बेजल-लेस डिझाइनमुळे त्याचा लूक अधिक जबरदस्त होतो.

फ्लिपकार्टवर सध्या इअर इंड सेल सुरू आहे. या सेल अंतर्गत स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यापूर्वी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Whats_app_banner