Dell Layoffs : जगातील या दिग्गज संगणक कंपनीनं १२,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं! कारण काय? वाचा-layoffs giant computer company dell fired 12500 employees business news ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dell Layoffs : जगातील या दिग्गज संगणक कंपनीनं १२,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं! कारण काय? वाचा

Dell Layoffs : जगातील या दिग्गज संगणक कंपनीनं १२,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं! कारण काय? वाचा

Aug 07, 2024 01:01 PM IST

Dell Layoffs : डेलने आपल्या सुमारे १२, ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीच्या १० टक्के कर्मचाऱ्यांवर याचा परिमाण झाला आहे.

जगातील या दिग्गज संगणक कंपनीनं १२,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं! कारण काय? वाचा
जगातील या दिग्गज संगणक कंपनीनं १२,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं! कारण काय? वाचा

Dell Layoffs : जगातील संगणक क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या डेलने आपल्या सुमारे १२,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने विक्री विभागात मोठा बदल करण्याचे ठरवले असून या साठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर केला जाणार आहे. आधुनिकीकरणासाठी प्रामुख्याने AI तंत्रज्ञाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कंपनीने टाळेबंदी जाहीर केली असून या अंतर्गत या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.

बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, कंपनीने ६ ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांना देण्यात अंतर्गत मेमोमध्ये या बदलांची माहिती दिली. ज्यात विक्री संघांना केंद्रीकृत करण्याच्या आणि नवीन AI-केंद्रित विक्री युनिट तयार करण्याच्या योजनांची माहिती देण्यात आली. कंपनीच्या या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नेमक्या संख्येची अधिकृत माहिती पुढे आली नसली तरी सुमारे १२,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे, असे न्यूजबाइटने म्हटले आहे. याचा फटका डेलच्या सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांना बसला आहे.

"ग्लोबल सेल्स मॉडर्नायझेशन अपडेट" नावाचा मेमो वरिष्ठ अधिकारी बिल स्कॅनेल आणि जॉन बायर्न यांनी कर्मचाऱ्यांना पाठवला होता. स्ट्रीम लाइन मॅनेजमेंटला सुव्यवस्थित करण्याच्या आणि गुंतवणुकीला र्प्राथमिकता देण्याच्या कंपनीच्या हेतूंचे या मेमोमध्ये वर्णन करण्यात आले आहे.

लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार या टाळेबंदी अंतर्गत किती कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले याची माहिती देण्यात आली नाही. विक्री विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी कामावरून काढून टाकल्याचे किंवा ज्यांना काढले त्या सहकाऱ्यांना ओळखत असल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाळेबंदीचा प्रामुख्याने व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापकांना फटका बसला. त्यापैकी काही कर्मचारी हे गेल्या दशकांपासून कंपनीत काम करत होते.

टाळेबंदीचा फटका कुणाला बसला ?

डेलमधील या टाळेबंदीचा फटका हा प्रामुख्याने व्यवस्थापक, संचालक आणि व्हीपी यांना बसला आहे. त्यांनी विपणन आणि ऑपरेशन्स या विभागातील कर्मचारी देखील या टाळेबंदीने प्रभावित झाले आहेत. एका कर्मचाऱ्याने ओळख न सांगण्याच्या अटीवर बिझनेस इनसाइडरला सांगितले की कीमान १२,५०० कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे.

दर सहा महिन्यांनी टाळेबंदी

टाळेबंदी हा डेलमधील मोठ्या ट्रेंडचा भाग आहे. कंपनीने फेब्रुवारी २०२३ पासून आपले कर्मचारी १३०,००० वरून १२०,००० पर्यंत कमी केले आहेत. कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “आमच्याकडे दर सहा महिन्यांनी टाळेबंदी जाहीर केली जाते. त्यामुळे आता कंपनीत पुढे जाण्याची संधी नाही. मी गेल्या नऊ महिन्यांपासून डेलच्या बाहेर नव्या नोकरीच्या शोधात आहे. डेलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बदल केले जात असल्याचे देखील त्याने सांगितले.

विभाग