Share Market News : डेंटल लॅब व्यवसायातील दुसरी मोठी कंपनी असलेल्या लक्ष्मी डेंटलचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला. तब्बल ६८९.०६ कोटींचा हा आयपीओ पहिल्या काही तासांतच १.४९ पट सबस्क्राइब झाला.
लक्ष्मी डेंटलचा आयपीओ ऑफर फॉर सेल आणि नवीन इश्यूचं मिश्रण आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनी ३२ लाख शेअर्स आणि १.३१ कोटी शेअर्स नव्यानं इश्यू करण्यात आले आहेत. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा शेअर १५० रुपयांपेक्षा जास्त प्रीमियमवर ट्रेड करत आहे.
हा आयपीओ १३ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत खुला राहणार आहे. शेअर्सचे वाटप १६ जानेवारीला होणार असून २० जानेवारीला बीएसई-एनएसईवर लिस्टिंग होणार आहे. लक्ष्मी डेंटल आयपीओसाठी ४०७ ते ४२८ रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं एकूण ३३ शेअर्सचा लॉट तयार केला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना किमान १४,१२४ रुपये गुंतवावे लागणार आहेत.
हा आयपीओ १० जानेवारी रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून ३१४.१३ कोटी रुपये उभे केले होते. आयपीओपैकी किमान ७५ टक्के भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव आहे. त्याचबरोबर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी जास्तीत जास्त १० टक्के राखीव ठेवण्याची तरतूद कंपनीनं केली आहे.
लक्ष्मी डेंटलचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये चांगल्या स्थितीत आहे. सोमवारी कंपनीचा आयपीओ १६० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होता. अशा परिस्थितीत मेनबोर्ड आयपीओ ५०० रुपयांच्या वर लिस्ट होऊ शकतो. तसं झाल्यास गुंतवणूकदारांसाठी हा फायद्याचा सौदा ठरणार आहे. कंपनीचा सर्वाधिक जीएमपी १६५ रुपये झाला आहे. ही पातळी ९ जानेवारीला होती.
संबंधित बातम्या