लावाचा धमाका! अवघ्या ९,४९९ रुपयांत लॉन्च केला ८ जीबी रॅम आणि ५० मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  लावाचा धमाका! अवघ्या ९,४९९ रुपयांत लॉन्च केला ८ जीबी रॅम आणि ५० मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन

लावाचा धमाका! अवघ्या ९,४९९ रुपयांत लॉन्च केला ८ जीबी रॅम आणि ५० मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन

Dec 27, 2024 04:44 PM IST

Lava Yuva 2 5G Launched: लावाने आपला लेटेस्ट स्मार्टफोन लावा युवा २ 5G लॉन्च केला आहे. १० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेल्या या फोनमध्ये भन्नाट फीचर्स मिळत आहेत.

लावा युवा २ 5G भारतात लॉन्च
लावा युवा २ 5G भारतात लॉन्च

Lava Yuva 2 5G Launched: भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावाने आपला नवीन स्मार्टफोन लावा युवा २ 5G लॉन्च केला आहे.  हा फोन बॅकलाइट डिझाइनसह लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये कॉल आणि नोटिफिकेशन आल्यावर लाइट ब्लिंक होईल. लावा युवा २ 5G फोनमध्ये पंच-होल डिझाइन डिस्प्ले आणि प्रीमियम मार्बल फिनिश देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस यात ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो इमेजिंग फीचर्ससह येतो. लावा युवा २ 5G किंमत, कलर व्हेरियंट आणि सर्व वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

लावा युवा २ 5G जी केवळ एका व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या फोनच्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. हा फोन ब्लॅक आणि व्हाईट या दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन प्रीमियम मार्बल फिनिशसह येतो. याआधी वनप्लस ११ आणि हुवावे पी ६० प्रो सारख्या फोनमध्ये मार्बल फिनिश पाहायला मिळत आहे. हा फोन आजपासून लावाच्या रिटेल आउटलेट्सवरून खरेदी करू शकता. कमी किंमतीत अधिक चांगल्या फीचर्सची अपेक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली संधी आहे. या स्मार्टफोनबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लावा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

लावा युवा २ 5G: डिस्प्ले

लावा युवा २ 5G मध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, ७०० निट्स ब्राइटनेस आणि सेंट्रल पंच-होल कटआऊटसह ६.६७ इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे.

लावा युवा २ 5G: प्रोसेसर/रॅम

फोनच्या मध्यभागी युनिसॉक टी ७६० चिपसेट आहे. फोनमध्ये तुम्हाला एकूण ८ जीबी रॅम सह ४ जीबी रॅम हार्डवेअर आणि ४ जीबी व्हर्च्युअल रॅम मिळेल. तसेच फोनमध्ये १२८ जीबी यूएफएस २.२ स्टोरेज आहे.

लावा युवा २ 5G: कॅमेरा

फोनच्या मागील बाजूस ५० एमपी+२ एमपी एआय कॅमेरा सेटअप आणि ८ एमपी सेल्फी कॅमेरा आहे.

लावा युवा २ 5G: बॅटरी 

लावाच्या या फोनमध्ये ५,००० एमएएच ची बॅटरी आहे जी १८ वॉट फास्ट चार्जिंगसोबत येते. हा फोन अँड्रॉइड १४ वर चालतो.

लावा युवा २ 5G: इतर वैशिष्ट्ये

 या फोनमध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर सेटअप, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट रीडर आणि फेस-अनलॉकिंग पर्याय आहे. लावा या फोनसोबत घरबसल्या १ वर्षाची वॉरंटी आणि मोफत सेवा देते.

Whats_app_banner