lava yuva 5g : लावाने बाजारात आणला मेड इन इंडिया’ 'युवा ५जी' फोन; फीचर पाहून व्हाल थक्क
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  lava yuva 5g : लावाने बाजारात आणला मेड इन इंडिया’ 'युवा ५जी' फोन; फीचर पाहून व्हाल थक्क

lava yuva 5g : लावाने बाजारात आणला मेड इन इंडिया’ 'युवा ५जी' फोन; फीचर पाहून व्हाल थक्क

May 31, 2024 05:23 PM IST

lava yuva 5g : भारतीय स्मार्ट फोन असलेल्या लावा कंपनीने भारतीय बाजारात नवा ५ जी फोन लॉन्च केला आहे. युवा ५ जी असे या फोनचे नाव असून यात विविध फीचर देखील देण्यात आले आहेत.

भारतीय स्मार्ट फोन असलेल्या लावा कंपनीने भारतीय बाजारात नवा ५ जी फोन लॉन्च केला आहे.
भारतीय स्मार्ट फोन असलेल्या लावा कंपनीने भारतीय बाजारात नवा ५ जी फोन लॉन्च केला आहे.

lava yuva 5g : स्मार्ट फोन तयार करणारी भारताची आघाडीची कंपनी लावा इंटरनॅशनल लिमिटेडने नवा फोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. युवा ५ जी असे या फोनचे नाव असून या फोनचे फीचर भन्नाट आहे. कंपनीने या फोनमध्ये दोन मेमरी स्लॉटदिले असून या फोनमध्ये शक्तिशाली बॅटरी बॅकअप, अफाट वेग व उत्कृष्ट दर्जाचा कॅमेरादेखील दिला आहे. या सोबतच काही विशेष फीचर देखील या फोनमध्ये कंपनीने दिले आहेत.

Nagpur temperature : नागपूरची अक्षरश: भट्टी झाली! तापमानाचा पारा ५६ अंशांवर, हवामान विभागालाही टोटल लागेना!

भारतीय बाजारपेठेत हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनची किंमत देखील खिशाला परवडणारी आहे. ६४ जीबी मेमरी असणाऱ्या या फोनची भारतीय बाजारात किंमत ही ९ हजार ४९९ रुपये आहे. तर १२८ मेमरी असणाऱ्या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये ऐवढी आहे. लावा ५जी फोन हा ५ जूनपासून अॅमेझॉन, लावा ई-स्टोअर आणि लावा रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

आजच्या तरुण पिढीचा विचार करून या फोनमध्ये अनेक फीचर देण्यात आले आहे. त्या दृष्टीने हा फोन डिझाईन करण्यात आला आहे. लावा युवा ५जी फोन हा मॅट फिनिशिंगसह प्रीमिअम स्लीक लुक आणि २ अतिशय आकर्षक अशा मिस्टिक ब्ल्यू आणि मिस्टिक ग्रीन रंगात उपलब्ध आहे. हा ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन उत्कृष्ट ग्लास बॅंक डिझाईन, साईड फिंगरप्रिंट सेन्सर, ४ जीबी अधिक ४जीबी रॅम आणि पिक्चर्स, व्हिडीओज तसेच मोठ्या फाईल्ससाठी उच्च क्षमतेच्या ६४ आणि १२८ मेमरीसह २. २ रोमसह सुसज्ज करण्यात आला आहे.

पुण्यात चाललंय काय! २२ वर्षीय तरुणीला जिंवत गाडण्याचा प्रयत्न, जेसीबीने खड्डा खणून अंगावर टाकली माती

या फोनमध्ये ५० एमपी एआय ड्युअल रिअर कॅमेरा आणि ८ एमपी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या खालच्या भागात असणारे फायरिंग स्पीकर आणि सी टाईप युएसबी केबल असणारा १८ वॅ. फास्ट चार्जिंग ही या फोनची खास वैशिष्ट्ये आहेत. कोणत्याही जाहिराती नसलेला, ब्लोटवेअर नसलेला आणि फेस अनलॉक सुविधा असणारा क्लीन अॅन्ड्रॉईड १३ सिस्टिमसह हा फोन ग्राहकांना भन्नाट अनुभव देणार आहे. ता फोनमध्ये २ वर्षांची सुरक्षितता अपडेटची हमी आणि अॅन्ड्रॉईड १४ पर्यंत अपग्रेड करण्याची सुविधा देखील कंपनीने दिली आहे या खेरीज, लावाकडून हँडसेटवर १ वर्षांची आणि अॅक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरन्टीही दिली आहे.

Modi Meditation: प्रसन्न सकाळ, सूर्यदेवास अर्घ्य आणि भगवा वस्त्र....अशा पद्धतीने ध्यानस्थ आहेत मोदी, पाहा PHOTOs

लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे मार्केटिंग हेड पुरवंश मैत्रेय म्हणाले, “लावा ग्राहकांचा प्रवास हा आमच्या व्यवसाय नैतिकतेचा एक अविभाज्य भाग आहे. नव्या कल्पना, किंमत, दर्जेदार उत्पादने आणि सेवेच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना काहीतरी चांगले देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. याचाच हा भाग असून तरुणांची स्मार्टफोन वापरण्याच्या पद्धती आणि प्राधान्य लक्षात घेऊन युवा ५जी ची रचना करण्यात आली आहे. यातील पॉवर पॅक वैशिष्ट्ये संपूर्ण सुरक्षा आणि खात्रीशीर अपडेटचा अनुभव देतात.”

लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे प्रॉडक्ट हेड सुमित सिंग म्हणाले, “नव्या कल्पना आणि उत्कृष्टता हे आमचे वैशिष्ट्य आहे. परवडणाऱ्या किंमतीमध्ये वेगाने काम करणारा नव्या काळातील हा स्मार्टफोन आहे. युवा ५जी ची रचना तरुणांना आवडणारी आहे, ऑक्टा-कोर प्रोसेसर, ड्युअल एआय कॅमेरा आणि जलद चार्जिंग अशा वैशिष्ट्यांनी युक्त असणारा हा युवा ५जी फोन भारतीय ग्राहकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे.”

Whats_app_banner