Lava Agni 3 Launched In India: लावाने आपला नवा मिड-रेंज स्मार्टफोन लावा अग्नी ३ अनेक नवीन फीचर्ससह भारतात लॉन्च केला आहे. नव्या लावा स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस सेकंडरी स्क्रीनसह ड्युअल डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये आयफोन १५ प्रो आणि आयफोन १६ सीरिजप्रमाणे अॅक्शन बटन देखील आहे. लावा अग्नी ३ गेल्या वर्षी भारतात प्रक्षेपित झालेल्या अग्नी २ ची जागा घेईल. लावा अग्नी ३ मध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसारखे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. फोनची किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
लावा अग्नी ३ 5G स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे. तर, २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. तर, चार्जरशिवाय १२८ जीबी व्हेरियंटची किंमत २०,९९९ रुपये आहे. तर, अग्नी २ फोनवर ग्राहकांना ८ हजार रुपयांचे एक्स्चेंज व्हॅल्यू मिळू शकते.
अॅमेझॉन इंडियावर हा स्मार्टफोन ४९९ रुपयांत प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असून त्याची विक्री ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. लावा अग्नी ३ हीथर ग्लास आणि प्रिस्टीन ग्लास या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
लावा अग्नी ३ मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाचा 1.5K 3D कर्व्ड प्रायमरी डिस्प्ले आहे. मागील बाजूस कॅमेरा सेन्सरच्या अगदी शेजारी १.७४ इंचाची एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० एक्स प्रोसेसरसह येतो. लावा अग्नी ३ मध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी यात ८ जीबी व्हर्च्युअल रॅम देखील देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये ओआयएस + ईआयएससह ५० एमपी प्रायमरी सेन्सर, ३ एक्स ऑप्टिकल झूम + ईआयएससह 8 एमपी टेलिफोटो लेन्स आणि 8 एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ईआयएससोबत १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
लावा अग्नी ३ मध्ये ६६ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली. नवीन लावा फोन अँड्रॉइड १४ आउट ऑफ द बॉक्सवर चालतो. लावा अग्नी ३ फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉस, आयफोनसारखी अॅक्शन कीज, यूएसबी टाइप-सी पोर्ट ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स मिळतात.
संबंधित बातम्या