ITR filings : टॅक्स टाईम ! ३१ जुलैनंतरही भरू शकतात आयटीआर, फक्त हे काम करावं लागेल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ITR filings : टॅक्स टाईम ! ३१ जुलैनंतरही भरू शकतात आयटीआर, फक्त हे काम करावं लागेल

ITR filings : टॅक्स टाईम ! ३१ जुलैनंतरही भरू शकतात आयटीआर, फक्त हे काम करावं लागेल

Jul 31, 2023 11:08 AM IST

ITR filings : ३० जुलैपर्यंत ६ कोटी आयकर रिटर्न्स दाखल करण्यात आले आहेत. आज आय़कर रिटर्न भरण्याचा अंतिम दिवस आहे. ३१ जुलैनंतर आयटीआर दाखल केल्यानंतर ५ हजार रुपयांचा भुर्दंड भरावा लागणार आहे.

Tax time HT
Tax time HT

ITR filings : आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आयटीआर भरण्याची अंतिम मुदत आज संपत आहे. कर्मचारी वर्ग आणि वैयक्तिक करदात्यांसाठी आज शेवटची संधी आहे. दरम्यान अंतिम तिथीनंतरही आयटीआर भरु शकतात. मात्र त्यासाठी पेनल्टी आणि व्याज भरावा लागेल. अशा आयटीआरला विलंब श्रेणीमध्ये ठेवले जाते. त्यासाठी अंतिम तिथी ३१ डिसेंबर आहे. त्यानंतरही जर कोणत्याही करदात्याने आयटीआर दाखल केला नाही तर त्याच्या समोर अनेक आर्थिक अडचणींची मालिका उभी राहू शकते.

५००० रुपये लेट फीस - आयकर कलम २३४ एफ नुसार, जर एखाद्या करदात्याचे एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे तर त्याला लेट फीस म्हणून ५ हजार रुपये भूर्दंड भरावा लागेल. जर ही मर्यादा ५ लाखांच्या आत आहे तर त्याला १ हजार रुपये भरावे लागतील. मात्र जर रिटर्न्स फाईल करण्याची गरज नसेल तर कोणताही भूर्दंड भरावा लागणार नाही.

प्रति महिना १ टक्का व्याज - उशीरा आयटीआर दाखल केल्यानंतर भूर्दंडाशिवाय व्याजही भरावे लागेल. आयकर कलम २३४ ए नुसार, एकूण उत्पन्नावर प्रति महिना एक टक्का हिशोबाने व्याज वसूल केलं जाईल. उदा. जर कोणत्याही करदात्याने ३ नोव्हेंबरला विलंबित आयटीआर दाखल केल्यास तर उशीराचे ३ महिने ३ दिवस होतील.पण व्याज मात्र ४ महिन्यांचे आकारले जाईल.

रिफंडावर व्याज नाही. - जर कोणत्याही करदात्याने रिफंडसाठी दावा केला असेल तर आयकर विभाग त्याची छाननी करेल. विलंब आयटीआरमध्ये रिफंड दाव्यावर कोणताही व्याज दिले जाणार नाही.

Whats_app_banner