EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी बातमी येतेय. जर तुम्ही अधिक पेन्शनसाठी अप्लाय केलं नसेल तर २६ जून २०२३ ही अंतिम मुदत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की नेहमीप्रमाणे ही डेडलाईन पुढे वाढेल तर ही शक्यता यापुढे धूसर आहे. कारण यापूर्वी २ वेळा अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम मुदतीची ही तारीख पुढे वाढण्याची शक्यता नाही.
दरम्यान, प्रत्येकजण या योजनेचा फायदा घेऊ शकणार नाहीयेत. या अधिक पेन्शन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी निकाल दिला आहेत. या निर्णयाच्या आथारावर उच्च पेन्शन रकमेसाठी योग्य पात्रता निर्धारित केली जाणार आहे.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, जी लोकं १ सप्टेंबर २०१४ ला ईपीएस आणि ईपीएफसाठी सदस्य बनले आणि त्यांची पात्रता अद्याप कायम आहे.
- तर दुसऱ्या कॅटेगरीत, जी लोक १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवा निवृत्त झाले आणि त्यांनी उच्च पेन्शनसाठी अर्ज केला होता. ज्या लोकांचा अर्ज ईपीएफओने रद्दबातल ठरवला होता, याच लोकांना उच्च पेन्शनसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी अंतिम मुदत २६ जून आहे.
- यूएएन क्रमांक
- पेन्शनर्ससाठी पेन्शन पेमेंट आॅर्डर
- ईपीएफ खात्यात पेमेंट प्रुफ
संबंधित बातम्या