stock market updates : लार्सन अँड टुब्रोला दुसऱ्या तिमाहीत ३३९५ कोटींचा नफा, शेअरची जोरदार उसळी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stock market updates : लार्सन अँड टुब्रोला दुसऱ्या तिमाहीत ३३९५ कोटींचा नफा, शेअरची जोरदार उसळी

stock market updates : लार्सन अँड टुब्रोला दुसऱ्या तिमाहीत ३३९५ कोटींचा नफा, शेअरची जोरदार उसळी

HT Marathi Desk HT Marathi
Published Oct 31, 2024 12:23 PM IST

l&t share price : लार्सन अँड टुब्रोच्या तिमाही नफ्यात दणदणीत वाढ झाली असून त्याचं प्रतिबिंब शेअर बाजारात उमटलं आहे. शेअरमध्ये आज ७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

एनएचपीसी शेअर किंमत
एनएचपीसी शेअर किंमत (फोटो-रॉयटर्स)

Larsen and Toubro share price : पायाभूत सेवा-सुविधा क्षेत्रातील दिग्गज कंपनी लार्सन अँड टुब्रोच्या दमदार तिमाही निकालाचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये वादळी वाढ आली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सुमारे ७ टक्क्यांनी वाढ झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरत असताना कंपनीनं ही कामगिरी केली आहे.

लार्सन अँड टुब्रो लिमिटेडच्या शेअरचा भाव गुरुवारी व्यवहारादरम्यान ३६३७ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३९४८.६० रुपये आहे. ३ जून २०२४ रोजी या शेअरनं हा स्तर गाठला होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये शेअरची किंमत २,८७२ रुपयांच्या नीचांकी पातळीवर होती.

एक्सपर्ट्स काय म्हणतात?

सप्टेंबर तिमाहीतील ऑर्डर फ्लोनं कमाल केल्याचं विश्लेषकांचं मत आहे. अशा परिस्थितीत एल अँड टीच्या शेअर्सकडं एक संधी म्हणून पाहिलं जाऊ शकतं. एमके ग्लोबलनं लार्सन अँड टुब्रोवर ४,३०० रुपये (पूर्वी ४,१०० रुपये) च्या सुधारित लक्ष्य किंमतीसह खरेदी रेटिंग कायम ठेवलं आहे. एमके ग्लोबलच्या मते, ऑर्डर आवक / महसूल अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. मार्जिन मात्र १०.३ टक्क्यांनी कमी होते. दुसरीकडं नुवामानं या शेअरसाठी ४ हजार रुपयांचं टार्गेट प्राइस ठेवलं आहे.

कशी आहे तिमाही आर्थिक कामगिरी?

लार्सन अँड टुब्रोचा निव्वळ नफा सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत ५ टक्क्यांनी वाढून ३३९५ कोटी रुपये झाला आहे. उत्पन्न वाढल्यानं कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ३,२२३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीचे उत्पन्न वाढून ६२६५५.८५ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते ५२, १५७.०२ कोटी रुपये होतं. सप्टेंबर तिमाहीत खर्च वाढून ५७,१००.७६ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी खर्चाचा आकडा ४७,१६५.९५ कोटी रुपये होता.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner