Multibagger Stock News Marathi : लान्सर कंटेनर लाइन्सच्या शेअरनं अवघ्या ४ वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. लान्सर कंटेनर लाइन्सच्या शेअर्सनी मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स ४ वर्षांत ४ रुपयांवरून ४० रुपयांपर्यंत वाढले असून या कालावधीत एक लाखाची गुंतवणूक ८९ लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. बोनस शेअर्सच्या वाटपामुळं ही कमाल झाली आहे.
लान्सर कंटेनर लाइन्सचा (Lancer Container Lines) शेअर १८ डिसेंबर २०२० रोजी ४.०७ रुपयांवर व्यवहार करत होता. एखाद्या व्यक्तीनं १८ डिसेंबर २०२० रोजी कंपनीचे शेअर्स १ लाख रुपयांना खरेदी केले असते तर त्याला २४,५७० शेअर्स मिळाले असते. लान्सर कंटेनर लाइन्सनं २०२० पासून दोनवेळा बोनस शेअर दिले आहेत. कंपनीनं ऑक्टोबर २०२१ मध्ये २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. कंपनीनं सप्टेंबर २०२३ मध्ये पुन्हा २:१ या प्रमाणात बोनस शेअर्सचं वाटप केलं. म्हणजेच कंपनीनं दोन्ही वेळा प्रत्येक एका शेअरवर २ बोनस शेअर्स दिले आहेत. या बोनस शेअर्सची बेरीज केल्यास एक लाख रुपयांत खरेदी केलेल्या शेअर्सची एकूण संख्या २,२१,१३० शेअर्स होईल. लान्सर कंटेनर लाइन्सचा शेअर आज म्हणजेच १९ डिसेंबर २०२४ रोजी ४०.५० रुपयांवर व्यवहार करत आहे. सध्याच्या शेअर किमतीनुसार लान्सर कंटेनर लाइन्सच्या २,२१,१३० शेअर्सची किंमत ८९.५५ लाख रुपये आहे.
मल्टीबॅगर कंपनी लान्सर कंटेनर लाइन्सनं २०१८ पासून ३ वेळा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स भेट दिले आहेत. कंपनीनं जानेवारी २०१८ मध्ये ३:५ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक ५ शेअरमागे ३ बोनस शेअर्सचं वाटप केलं. कंपनीनं ऑक्टोबर २०२१ मध्ये २:१ गुणोत्तरात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच लान्सर कंटेनर लाइन्सनं प्रत्येक एका शेअरमागे २ बोनस शेअर्स दिले. उद्योगाशी संबंधित कंपनीनं सप्टेंबर २०२३ मध्ये २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत.
संबंधित बातम्या