KRN Heat Exchanger IPO allotment : केआरएन हीट एक्स्चेंजर आणि रेफ्रिजरेशन लिमिटेडच्या आयपीओचं गुंतवणूकदारांना आज वाटप होण्याची शक्यता आहे. अलॉटमेंट स्टेटस तपासू शकतात. बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) मिळालेल्या प्रचंड सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर या आयपीओबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
कंपनीने केआरएन हीट एक्स्चेंजरच्या आयपीओचा दरपट्टा २०९ ते २२० रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीनं ३४१.९५ कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आयपीओला मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे ग्रे मार्केटमध्येही उत्साह आहे. केआरएन हीट एक्स्चेंजर अँड रेफ्रिजरेशन लिमिटेडचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये २५३ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध होते.
> केआरएन हीट एक्स्चेंजर आयपीओ शेअर अलॉटमेंट स्थिती ऑनलाइन तपासण्यासाठी खालील प्रकिया पूर्ण करा.
> एनएसईच्या वेबसाइटला भेट द्या आणि एनएसई आयपीओ अलॉटमेंट स्टेटस पेज उघडा.
> आपल्या क्रेडेन्शियल्सचा वापर करून लॉग इन करा. आधी नोंदणी केली नसेल तर नवा लॉगिन आयडी तयार करून स्वत:ची नोंदणी करा.
> लॉग इन केल्यानंतर कंपनीचं नाव तपासा. उपलब्ध यादीतून केआरएन हीट एक्स्चेंजर आणि रेफ्रिजरेशन निवडा.
> तुमचे पॅन कार्ड डिटेल्स टाका.
> तुमचा आयपीओ क्रमांक नमूद करा आणि 'मी रोबो नाही' चेकबॉक्सवर क्लिक करा.
> सबमिट करा आणि तुमचे अलॉटमेंट स्टेटस तपासा.
> bigshare services या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
> ड्रॉपडाऊन मेनूमधून केआरएन हीट एक्स्चेंजर आणि रेफ्रिजरेशनचा पर्याय निवडा.
> त्या क्षणी उपलब्ध तपशीलांपैकी कोणताही तपशील निवडा: अर्ज क्रमांक, लाभार्थी आयडी किंवा पॅन.
> कॅप्चा मध्ये टाईप करा.
> अलॉटमेंट स्टेटस तपासण्यासाठी सर्च बटणावर क्लिक करा.
केआरएन हीट एक्स्चेंजर आयपीओचे अधिकृत निबंधक म्हणून बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे. शेअर अलॉटमेंट आज अपेक्षित आहे. केआरएन हीट एक्स्चेंजरचा आयपीओ "टी +३" लिस्टिंग नियमाप्रमाणे ३ ऑक्टोबर रोजी सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला शेअर बाजाराला सुट्टी असेल.