दोन वर्षांत तिसऱ्यांदा बोनस देणार ही कंपनी! चार वर्षांत शेअरमध्ये ८ हजारहून अधिक टक्क्यांची वाढ
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  दोन वर्षांत तिसऱ्यांदा बोनस देणार ही कंपनी! चार वर्षांत शेअरमध्ये ८ हजारहून अधिक टक्क्यांची वाढ

दोन वर्षांत तिसऱ्यांदा बोनस देणार ही कंपनी! चार वर्षांत शेअरमध्ये ८ हजारहून अधिक टक्क्यांची वाढ

HT Marathi Desk HT Marathi
Nov 12, 2024 11:43 AM IST

KPI Green Energy Bonus Shares : केपीआय ग्रीन एनर्जीनं आपल्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअरची भेट देण्याचा विचार सुरू केला आहे. काय आहे कंपनीच्या शेअरचा सध्याचा भाव? पाहूया..

केपीआय ग्रीन एनर्जीनेही आपल्या समभागांची विभागणी केली आहे.
केपीआय ग्रीन एनर्जीनेही आपल्या समभागांची विभागणी केली आहे.

KPI Green Energy share price : सौर ऊर्जा कंपनी केपीआय ग्रीन एनर्जीचा शेअर तेजीच्या लाटेवर स्वार असून आज त्यात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा शेअर आता ७८८.८५ रुपयांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीनं गुंतवणूकदारांना मोफत शेअरची भेट देण्याची तयारी केली आहे.

केपीआय ग्रीन एनर्जीच्या संचालक मंडळाची बैठक १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत बोनस शेअर्सच्या मुद्द्यावर विचार केला जाईल. बोनस शेअर जारी करण्यास मान्यता मिळाली तर २०२४ मध्ये केपीआय ग्रीन एनर्जी आपल्या गुंतवणूकदारांना विनामूल्य समभाग देण्याची ही दुसरी वेळ असेल.

मागच्या दोन वर्षांत कंपनीनं तिसऱ्यांदा बोनस शेअर देण्याची ही तिसरी वेळ असेल. केपीआय ग्रीन एनर्जीनं जानेवारी २०२३ मध्ये आपल्या भागधारकांना १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक १ शेअरमागे १ बोनस शेअर वाटला. तर, फेब्रुवारी २०२४ मध्ये १:२ या प्रमाणात बोनस शेअरही दिले आहेत. कंपनीनं जुलै २०२४ मध्ये शेअरचं विभाजनही केलं आहे. १० रुपयांच्या अंकित मूल्याच्या आपल्या शेअरची ५ रुपयांच्या अंकित मूल्याच्या २ शेअर्समध्ये विभागणी केली आहे.

शेअर्समध्ये ४ वर्षात ८१०० पेक्षा जास्त वाढ

केपीआय ग्रीन एनर्जीचे शेअर्स तेजीत आहेत. गेल्या ४ वर्षात सौर ऊर्जा कंपनीचे शेअर्स ८१५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. केपीआय ग्रीन एनर्जीचा शेअर १२ नोव्हेंबर २०२० रोजी ९.५० रुपयांवर होता. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ७८८.८५ रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या २ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ४७५ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १११६ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३४३.७० रुपये आहे.

गेल्या वर्षभरात केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये १२५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर ३४९.५० रुपयांवर होता. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ७८८.८५ रुपयांवर बंद झाला. तर कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षी आतापर्यंत ६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner