Bonus Share : पाच वर्षांत ११,००० टक्क्यांहून जास्त नफा दिल्यानंतर आता कंपनी देणार बोनस; तुमच्याकडं आहे का हा शेअर?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bonus Share : पाच वर्षांत ११,००० टक्क्यांहून जास्त नफा दिल्यानंतर आता कंपनी देणार बोनस; तुमच्याकडं आहे का हा शेअर?

Bonus Share : पाच वर्षांत ११,००० टक्क्यांहून जास्त नफा दिल्यानंतर आता कंपनी देणार बोनस; तुमच्याकडं आहे का हा शेअर?

Dec 20, 2024 12:02 PM IST

KPI Green Energy Ltd Bonus Share News : केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीनं बोनस शेअरची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

पाच वर्षांत ११,००० टक्क्यांहून जास्त रिटर्न दिल्यानंतर आता कंपनी देणार बोनस; तुमच्याकडं आहे का हा शेअर?
पाच वर्षांत ११,००० टक्क्यांहून जास्त रिटर्न दिल्यानंतर आता कंपनी देणार बोनस; तुमच्याकडं आहे का हा शेअर?

Bonus Share Marathi News : शेअर बाजारात सक्रिय गुंतवणूकदार असलेल्यांसाठी रोजच्या रोज काही ना काही बातम्या येतच असतात. यातील डिविडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरच्या बातम्या गुंतवणूकदारांचे चेहरे फुलवतात. अशीच चेहरे फुलवणारी बातमी आता आली आहे. केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडनं बोनस शेअर देणार असून त्यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.

केपीआय ग्रीन एनर्जीनं बोनस शेअर देण्याची मागच्या वर्षभरातील ही दुसरी वेळ आहे. रेकॉर्ड डेट जाहीर करताच कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आज बीएसईवर कंपनीचा शेअर ७९२ रुपयांवर उघडला. गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यानंतर शेअर ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं आणि शेअरची किंमत ८०१.५० रुपयांच्या पातळीवर पोहोचली.

रेकॉर्ड डेट कधी आहे?

केपीआय ग्रीनच्या संचालक मंडळानं स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी ५ रुपयांच्या अंकित मूल्याच्या २ शेअर्ससाठी १ नवीन शेअर देणार आहे. कंपनीनं या बोनस शेअरसाठी शुक्रवार, ३ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीनं एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार केला होता. त्यावेळी कंपनीनं गुंतवणूकदारांना २ शेअरवर १ शेअरचा बोनस दिला.

शेअर झालाय स्प्लिट 

ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या शेअर्सचं विभाजन करण्यात आलं होतं. कंपनीनं आपल्या शेअरचे दोन भाग केले होते. या शेअर विभाजनानंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू ५ रुपयांपर्यंत खाली आली.

केपीआय ग्रीनसाठी २०२४ कसं गेलं?

यंदा कंपनीच्या शेअरच्या किमतीत ६७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर एका वर्षात कंपनीनं पोझिशनल गुंतवणूकदारांना ८८ टक्के परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांना कंपनी चांगला परतावा देईल अशी अपेक्षा होती आणि त्यांनी ६ महिन्यांपूर्वीच हा शेअर खरेदी केला असता, ते सर्व सध्या तोट्यात आहेत. बीएसईच्या आकडेवारीनुसार, केपीआय ग्रीन एनर्जीचा शेअर गेल्या सहा महिन्यांत जवळपास १० टक्क्यांनी घसरला आहे.

गेल्या दोन वर्षांत केपीआय ग्रीन एनर्जी या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ४१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या ५ वर्षात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ११७९४.५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner