Stock Market News Today : कोठारी प्रॉडक्ट्सच्या शेअरमध्ये आज जोरदार तेजी पाहायला मिळाली. बीएसईवर कोठारी प्रॉडक्ट्सचा शेअर आज ७ टक्क्यांनी वधारून २०९.७० रुपयांवर पोहोचला. बोनस शेअर्सच्याघोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली.
कोठारी प्रॉडक्ट्सच्या संचालक मंडळानं १:१ या प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक एका शेअरवर १ बोनस शेअर देणार आहे. कंपनीनं बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही.
कोठारी प्रॉडक्ट्स गेल्या १० वर्षांत तिसऱ्यांदा आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देणार आहे. यावेळी कंपनी १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देत आहे. कंपनीनं जानेवारी २०१६ मध्ये १:२ या प्रमाणात बोनस शेअर्सची ऑफर दिली होती. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक २ शेअरमागे एक बोनस शेअर दिला. त्याआधी मार्च २०१४ मध्ये २:१ या प्रमाणात बोनस शेअर्श दिले होते. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक एका शेअरमागे २ बोनस शेअर्स दिले होते.
कोठारी प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या ५ वर्षांत २२५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ३ जानेवारी २०२० रोजी कंपनीचा शेअर ६२.४० रुपयांवर होता. तो शेअर आज, ३० डिसेंबर २०२४ रोजी २०९.७० रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर १२६.८५ रुपयांवर होता. ३० डिसेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २०९.७० रुपयांवर पोहोचला. कोठारी प्रॉडक्ट्सच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर २२७.३५ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १११.१५ रुपये आहे.
संबंधित बातम्या