मराठी बातम्या  /  Business  /  Know Your Ppf Calculator

PPF: दररोज फक्त ४१६ रुपये गुंतवा आणि करोडपती व्हा!

PPF HT
PPF HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Nov 19, 2022 04:00 PM IST

PPF: सर्वसामान्य नोकरदारांना पीपीएफ हे गुंतवणूकीचे योग्य साधन वाटते. मात्र आजही अनेकांना नेमकी यात कशाप्रकारे गुंतवणूक करावी याचा हा मार्गदर्शनपर लेख -

PPF: पीपीएफ खाते पंधरा वर्षांनी मच्युअर्ड होते. मात्र त्यात जर तुम्ही ३५ वर्षे गुंतवणूक केली तर करोडपती होऊ शकता. या कालावधीमध्ये प्रत्येक महिना १२५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

ट्रेंडिंग न्यूज

सर्वसामान्य नोकरदार वर्गासाठी लघू मुदत योजना - पीपीएफ ही अत्यंत लोकप्रिय आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूकीवर केंद्र सरकार ७.१० टक्के व्याज देते. तर करबचतही करता येते. एका आर्थिक वर्षात १.५० लाख रुपयांपर्यंत रक्कम वाचवून ठेवू शकतो. जर तुम्ही दर दिवशी ४१६ रुपयांची बचत केली तर २.२७ कोटी रुपयांची बचत कशी करता येईल याचे गणित आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पीपीएफचे खाते १५ वर्षात मच्युअर्ड होते. मात्र ती पुढील ३५ वर्षे सुरु ठेवल्यानंतर तुम्ही करोडपती होऊ शकता. या कालावधीत प्रत्येक महिना अंदाजे १२५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी प्रत्येक दिवशी ४१६ रुपयांची बचत करावी लागेल. हे चक्र पुढील ३५ वर्षे असेच सुरु राहिल्याने मच्युअटीच्या वेळी २,२७ कोटींची बचत होईल.

संबंधित बातम्या

विभाग