LIC Policy Revival : तुमची एलआयसी पाॅलिसी लॅप्स झालीय? चिंता नको! अशी करता येईल पुन्हा सुरू
LIC Policy Revival : तुमची कोणतीही जुनी पॉलिसी लॅप्स झाली असल्यास, तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ती रीस्टार्ट करू शकतात.
LIC Policy Revival : भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. त्याचे देशभरात करोडो पॉलिसीधारक आहेत. अनेक वेळा लोक पॉलिसी खरेदी करतात. परंतु काही कारणास्तव त्याचा हप्ता भरण्यास सक्षम नसतात. प्रीमियम वेळेवर भरला नाही तर पॉलिसी लॅप्स होते.(LIC Lapsed Policy Revival) अशा पॉलिसींच्या पुनरुज्जीवनासाठी एलआयसी स्पेशल कॅम्पेन फॉर पॉलिसी रिव्हायव्हल चालवली जाते.
ट्रेंडिंग न्यूज
एलआयसीने १ ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान लॅप्स पॉलिसी रीस्टार्ट करण्यासाठी विशेष मोहीम चालवली आहे. त्यामुळे या कालावधीचा फायदा घेऊन तुमची लॅप्स झालेली पाॅलीसी पुन्हा वेळेवर सुरू करता येईल.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नियमांनुसार, जर एखाद्या पॉलिसीधारकाची पॉलिसी प्रीमियम न भरल्यामुळे रद्द होते. अशावेळी जर पॉलिसी पुन्हा चालू करायची असेल तर तुम्हाला थकबाकी प्रीमियमसह काही दंड भरावा लागेल. थकित प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी पुन्हा चालू करता येते. यानंतरच तुम्ही त्याच्याशी संबंधित उर्वरित फायदे घेऊ शकतात.
लॅप्स झालेली पाॅलीसी पुन्हा सुरू करा
तुमची कोणतीही लॅप्स झालेली एलआयसी पाॅलीसी सुरू करायची असेल तर त्यासाठी तुम्ही एलआयसीशी संपर्क साधावा.यासाठी तुम्ही ईमेलद्वारे एलआयसी कस्टमर केअरशी संपर्क साधू शकतात. सर्वप्रथम एलआयसी शाखेत जा आणि पुनरुज्जीवन फॉर्म सबमिट करा. यासह, उशीरा प्रीमियम आणि दंड भरून तुमची पॉलिसी पुन्हा चालू करता येते.
विभाग