मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stocks : एका महिन्यात या शेअर्सचे पैसे होणार दुप्पट, गुंतवणूकीचा तज्ज्ञांचा सल्ला

Multibagger stocks : एका महिन्यात या शेअर्सचे पैसे होणार दुप्पट, गुंतवणूकीचा तज्ज्ञांचा सल्ला

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 20, 2023 05:30 PM IST

Multibagger stocks : शेअर बाजार दबावाखाली असताना पैसे कमावण्याची चांगली संधी असते. त्यामुळे गेल्या महिन्याभरातील अशाच बक्कळ परतावा देणाऱ्या नऊ टाॅप स्टाॅक्सची यादी देत आहोत.

Multibagger stocks HT
Multibagger stocks HT

Multibagger stocks : शेअर बाजारातील घसरणीमध्ये पैसे दुप्पट करणारे शेअर्स सापडतात. गेल्या महिन्याभरातील शेअर बाजारातील चढ उतारांचा कल पाहिला की, गेल्या एका महिन्यात ९ शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या काळात अदानी वादामुळे शेअर बाजार खूप दबावाखाली होता ही वेगळी बाब आहे. या शेअर्सची नावे तुम्ही ऐकली नसतील, परंतु या समभागांनी एका महिन्यात खूप चांगला परतावा दिला आहे. या शीर्ष ९ समभागांनी १०० टक्के ते १६४ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

एका महिन्यात बक्कळ परतावा देणारा शेअर्स

टेलरमेड रिन्यूएबल्स शेअरचा दर आज महिन्याभरापूर्वी ४५.८५ रुपये होता. आणि आता या शेअरचा दर १२०.९० रुपये आहे. अशा प्रकारे, या स्टॉकने १ महिन्यात १६३.७९% परतावा दिला आहे.

इतर स्टाॅक्सची यादी

- आजपासून एका महिन्यापूर्वी एलांत्रा व्हेंचर्सचा शेअर दर रु.३२.८० होता. तर आता या शेअरचा दर रु.८६.१५ आहे. अशा प्रकारे, या स्टॉकने १ महिन्यात १६२.६५% परतावा दिला आहे.

- झवेरी क्रेडिट्सचा शेअर दर आजपासून एक महिना आधी रु.९.७३ होता. आणि आता या शेअरचा दर २५.५२ रुपये आहे. अशा प्रकारे या समभागाने १ महिन्यात १६२.२८% परतावा दिला आहे.

- इंटिग्रेटेड टेक शेअर रेट आजपासून महिन्यापूर्वी रु.१४.२० होता. तर आता या शेअरचा दर रु.३७.२० आहे. अशा प्रकारे, या समभागाने १ महिन्यात १६१.९७% परतावा दिला आहे.

-आजपासून एक महिना आधी साॅफ्टट्रॅक व्हेंचर शेअरचा दर रु.२.७९ होता. आणि आता या शेअरचा दर ७.२३ रुपये आहे. अशा प्रकारे या समभागाने १ महिन्यात १५९.१४% परतावा दिला आहे.

- आजपासून एक महिन्यापूर्वी अवीर फूड्सचा शेअर दर रु.१५४.९५ होता. आणि आता या शेअरचा दर ३९३.४५ रुपये आहे. अशा प्रकारे या समभागाने १ महिन्यात १५३.९२% परतावा दिला आहे.

- आजपासून एक महिन्यापूर्वी किरण प्रिंट पॅक शेअरचा दर रु.४ होता. आणि आता या शेअरचा दर ८.६६ रुपये आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग