बोनस शेअर्ससाठी कंपनीनं जाहीर केली रेकॉर्ड डेट; तुमच्याकडं आहेत का हे शेअर्स? लगेच चेक करा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  बोनस शेअर्ससाठी कंपनीनं जाहीर केली रेकॉर्ड डेट; तुमच्याकडं आहेत का हे शेअर्स? लगेच चेक करा!

बोनस शेअर्ससाठी कंपनीनं जाहीर केली रेकॉर्ड डेट; तुमच्याकडं आहेत का हे शेअर्स? लगेच चेक करा!

Jan 07, 2025 04:57 PM IST

Kitex Garments Bonus Shares : किटेक्स गारमेंट्स लिमिटेडनं याआधीच बोनस शेअर्सची घोषणा केली असून त्यासाठीची रेकॉर्ड डेट आज जाहीर केली आहे. त्यामुळं शेअर चांगलाच वधारला आहे.

बोनस शेअर्ससाठी कंपनी जाहीर केली रेकॉर्ड डेट; तुमच्याकडं आहेत का हे शेअर्स? लगेच चेक करा!
बोनस शेअर्ससाठी कंपनी जाहीर केली रेकॉर्ड डेट; तुमच्याकडं आहेत का हे शेअर्स? लगेच चेक करा!

Bonus Share News : किटेक्स गारमेंट्स लिमिटेडनं बोनस शेअरची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. ही तारीख जाहीर होताच शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आणि शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. किंमतीमधील वाढीमुळं कंपनीच्या शेअरची किंमत बीएसईवर ६९१.७० रुपयांच्या पातळीवर पोहोचली.

किटेक्स गारमेंट्सनं स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, पात्र गुंतवणूकदारांना १ रुपये अंकित मूल्य असलेल्या एका शेअरसाठी २ शेअर्स दिले जातील. त्यासाठी १७ जानेवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.

किटेक्स गारमेंट्स लिमिटेडनं गुंतवणूकदारांना दुसऱ्यांदा बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीनं २०१७ मध्ये गुंतवणूकदारांना बोनस शेअर दिले होते. त्यानंतर कंपनीच्या वतीनं ५ शेअर्सवर २ शेअर बोनस देण्यात आले.

शेअर बाजारात कामगिरी कशी?

किटेक्स गारमेंट्स लिमिटेडच्या गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातून आनंदाची बातमी आहे. कंपनीच्या शेअरची किंमत ६ महिन्यांत २१२ टक्क्यांनी वाढली आहे. तर या शेअरनं वर्षभरात गुंतवणूकदारांना १९६ टक्के परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९०० रुपये प्रति शेअर आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १७६.८० रुपये प्रति शेअर आहे.

बीएसईच्या आकडेवारीनुसार, गेल्या ५ वर्षांत किटेक्स गारमेंट्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये जवळपास ५०० टक्क्यांची वाढ झाली आहे. सप्टेंबर तिमाहीपर्यंत कंपनीत प्रवर्तकांची ५६.६६ टक्के आणि जनतेची ४३.३४ टक्के हिस्सेदारी होती. गेल्या तीन तिमाहींपासून कंपनीच्या शेअरहोल्डिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

दरवर्षी लाभांश देते कंपनी

किटेक्स गारमेंट्स लिमिटेडनेही आपल्या गुंतवणूकदारांना सातत्यानं लाभांश दिला आहे. कंपनीने गेल्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना दरवर्षी १.५० रुपये प्रति शेअर या दराने लाभांश दिला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner