Kia Syros : किया सिरॉस भारतात लाँच; अनोख्या लुकच्या एसयूव्हीमध्ये दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत व संपूर्ण डिटेल्स
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Kia Syros : किया सिरॉस भारतात लाँच; अनोख्या लुकच्या एसयूव्हीमध्ये दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत व संपूर्ण डिटेल्स

Kia Syros : किया सिरॉस भारतात लाँच; अनोख्या लुकच्या एसयूव्हीमध्ये दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत व संपूर्ण डिटेल्स

Feb 02, 2025 07:27 PM IST

Kia Syros : किया इंडियाने नवीन किआ सिरोस लाँच करताना मिड आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणींदरम्यान एक नवीन एसयूव्ही सेगमेंट सादर केले आहे. जाणून घेऊया किंमत, फिचर्स व अन्य माहिती..

किया सिरॉस भारतात लाँच
किया सिरॉस भारतात लाँच

Kia Syros (किया सिरॉस) एसयूव्ही भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. कंपनीने याची सुरुवातीची किंमत ९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. कार निर्माता कंपनी Kia India (किया इंडिया) ने नवीन किआ सिरोस लाँच करताना मिड आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणींदरम्यान एक नवीन एसयूव्ही सेगमेंट सादर केले आहे. सिरोस एसयूव्ही खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांसाठी ही कार कंपनीच्या अधिकृत डीलरशिपवर उपलब्ध आहे. किआ सिरोसची डिलीव्हरी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

कंपनीचे प्रीमियम मॉडेल्‍स ईव्‍ही ९ व कार्निवलमधील डिझाइनमधून प्रेरणा घेत सिरॉसमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम आरामदायीपणा व आकर्षक डिझाइनचे एकत्रिकरण आहे. 

किया इंडियाचे चीफ सेल्‍स ऑफिसर जून्‍सू चो म्‍हणाले, भारतात एसयूव्‍हीची मागणी वाढत आहे. या विकसित होत असलेल्‍या प्राधान्‍यक्रमांशी बांधील राहत किया इंडिया नाविन्‍यता आणि ग्राहक-केंद्रित डिझाइनच्‍या माध्‍यमातून ऑटोमोटिव्‍ह उद्योगामध्‍ये नवीन म़ॉडेल बाजारात आणत असते. किया सिरॉसमध्ये प्रगत तंत्रज्ञान, आरामदायीपणा आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे. 

अद्वितीय तंत्रज्ञान व स्‍मार्ट कनेक्‍टीव्‍हीटी:

  • किया सिरॉसमध्‍ये सेगमेंट-फर्स्‍ट ओव्‍हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपेडट सिस्‍टम आहे, जी ऑटोमॅटिकली १६ कंट्रोलर्सचे अपडेट करते. हे इनोव्‍हेशन सामान्‍यत: लक्‍झरी कारमध्ये दिसून येते.
  • किया कनेक्‍ट २.० सिस्‍टममध्‍ये ८० हून अधिक वैशिष्‍ट्यांची व्‍यापक श्रेणी आहे, जी विनासायास कनेक्‍टीव्‍हीटी आणि इंटेलिजण्‍ट व्हेईकल मॅनेजमेंटच्‍या माध्‍यमातून ड्रायव्हिंग अनुभव अधिक उत्‍साहित करते.
  • कियाने कनेक्‍ट डायग्‍नोसिस (केसीडी) सादर केले आहे, जे वापरकर्त्‍यांना दूरूनच त्‍यांच्‍या गाडीचे मूल्‍यांकन करण्‍याची सुविधा देते आणि किया अडवान्‍स्‍ड टोटल केअर (केएटीसी) सक्रियपणे ग्राहकांना टायर रिप्‍लेसमेंट्स व मेन्‍टेनन्‍स अशा आवश्‍यक सर्विसेसबाबत माहिती देते, ज्‍यामधून विनासायास मालकी हक्‍काची खात्री मिळते.

प्रीमियम आरामदायीपणा व एैसपैस इंटीरिअर्स:

२,५५० मिमी व्‍हीलबेससह किया सिरॉस प्रवाशांच्‍या आरामदायीपणाला प्राधान्‍य देते. ७६.२ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेल कनेक्‍टेड कार नेव्हिगेशन कॉकपीटप्रमाणे सेवा देते, ज्‍यामधून विनासायास डिजिटल इंटरफेस मिळते.

किया सिरॉसची वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:

• ५-इंच क्‍लायमेट कंट्रोल डिस्‍प्‍ले, जे जलदपणे व सहजपणे क्‍लायमेट सेटिंग्‍ज देते.

• वायरलेस अॅप्‍पल कारपले व अँड्रॉईड ऑटोसह सर्वोत्त्‍म ऑडिओ अनुभवासाठी हार्मन कार्डन प्रीमियम ८-स्‍पीकर साऊंड सिस्टम.

• रिअर सीट व्‍हेंटिलेशन, पुढील आसनांपर्यंत आरामदायीपणा.

• स्‍लायडिंग व रिक्‍लायनिंग ६०:४० स्प्लिट रिअर सीट्स ज्‍या स्थिर बूट स्‍पेस आणि सुधारित प्रवासी आरामदायीपणा देतात.

•  ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ, जे केबिनमध्‍ये हवा खेळती राहण्‍याचा अनुभव देते.

 

इंजिन व व्‍हेरिएण्‍ट्स:

किया सिरॉस दोन इंजिन पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे: 

•   स्‍मार्टस्‍ट्रीम १.०-लिटर टूर्बो पेट्रोल इंजिन (८८.३ केडब्‍ल्‍यू/१२० पीएस, १७२ एनएम)

•  १.५-लिटर सीआरडीआय डिझेल इंजिन (८५ केडब्‍ल्‍यू/११६ पीएस, २५० एनएम)

दोन्‍ही इंजिन्‍स मॅन्‍युअल व ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन पर्यायांसोबत कियाचे ६एमटी कन्फिग्‍युरेशन असलेल्‍या पहिल्‍याच स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.० टर्बो जीडीआयसह ऑफर करण्‍यात आले आहेत.

सिरॉस एचटीके, एचटीकेक+, एचटीएक्‍स, एचटीएक्‍स+ या चार ट्रिम्‍समध्‍ये, तसेच ग्‍लेशियर व्‍हाइट पर्ल, स्‍पार्कलिंग सिल्‍व्‍हर, प्‍यूटर ऑलिव्‍ह, इंटेन्‍स रेड, फ्रॉस्‍ट ब्‍ल्‍यू, अरोरा ब्‍लॅक पर्ल, इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यू आणि ग्रॅव्हिटी ग्रे या आठ रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

Whats_app_banner