किआ सोनेट ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. एसयूव्हीच्या झपाट्याने वाढत्या मागणीमुळे देशातील प्रत्येक वाहन निर्माता कंपनी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या कारमध्ये किया कंपनीचा देखील समावेश आहे. सेल्टोस मिड-साइज एसयूव्हीसह यशाची चव चाखल्यानंतर कियाने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सोनेट देशात सादर केले.
किआ इंडियाने यावर्षी जानेवारीमध्ये अपडेटेड सॉनेट कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केली. किआ सोनेट फेसलिफ्टमध्ये आकर्षित डिझाइन आणि अनेक सुधारित वैशिष्ट्ये देण्यात आली. मात्र, कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे बेसिक सिल्हूट कारच्या प्री-फेसलिफ्ट व्हर्जनसारखेच ठेवले आहे. या अपडेटेड व्हर्जनच्या लाँचिंगसह किआ सेल्टोसने टाटा नेक्सन, ह्युंदई व्हेन्यू, मारुती सुझुकी ब्रेझा, निसान मॅग्नाइट आणि महिंद्रा एक्सयूव्ही ३०० सारख्या कंपनीशी आपली स्पर्धा पुन्हा मजबूत केली आहे.
किआ सोनेट कॉम्पॅक्ट एसयूव्हीची किंमत ७.९९ लाख ते १४.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. दुसरीकडे, महिंद्रा एक्सयूव्ही ३०० ची एक्स शोरूम किंमत ७.९९ लाख ते १३ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. किआ सोनेट आणि महिंद्रा एक्सयूव्ही ३०० एसयूव्ही दोन्ही समान सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहेत. तर, आधीच्या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त आहे.
किआ सोनेट दोन पेट्रोल आणि सिंगल डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिनमध्ये १.२ लीटर युनिट आणि १.० लीटर टर्बोचार्ज्ड युनिटचा समावेश आहे. १.२ लीटर पेट्रोल इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे आणि हे ८२ बीएचपी पीक पॉवर आणि ११५ एनएम टॉर्क जनरेट करते.
१.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनमध्ये सहा स्पीड आयएमटी आणि सात स्पीड डीसीटी ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत. ही मोटर ११८ बीएचपी पीक पॉवर आणि १७२ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. एसयूव्हीच्या डिझेल व्हेरियंटमध्ये १.५ लीटर इंजिन आहे, जे ११४ बीएचपी पीक पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनमध्ये सहा स्पीड मॅन्युअल, सहा स्पीड आयएमटी आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक युनिटचे ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत.
महिंद्रा एक्सयूव्ही ३०० दोन पेट्रोल आणि सिंगल डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन १०८ बीएचपी पीक पॉवर आणि २०० एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तर १.२ लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन १२८ बीएचपी पीक पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. डिझेल इंजिन १.५ लीटर टर्बोचार्ज्ड युनिट आहे, जे ११५ बीएचपी पॉवर आणि ३०० एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. एसयूव्हीमध्ये सहा स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आणि सहा स्पीड एएमटी युनिट चा समावेश आहे.