zomato : १३३ रुपयांच्या मोमोंची डिलिव्हरी न केल्याने झोमॅटोला दणका! द्यावी लागली ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  zomato : १३३ रुपयांच्या मोमोंची डिलिव्हरी न केल्याने झोमॅटोला दणका! द्यावी लागली ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई

zomato : १३३ रुपयांच्या मोमोंची डिलिव्हरी न केल्याने झोमॅटोला दणका! द्यावी लागली ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई

Jul 12, 2024 02:53 PM IST

zomato news : कर्नाटकातील एका महिलेला १३३.२५ रुपयांचे मोमो न दिल्याबद्दल झोमॅटोला ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. एका महिलेने ३१ ऑगस्ट २०२३ रोजी झोमॅटोद्वारे मोमोज ऑर्डर केले होते, जे तिला अजूनही मिळालेले नाही.

१३३ रुपयांच्या मोमोंची डिलिव्हरी न केल्याने झोमॅटोला दणका! द्यावी लागली ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई
१३३ रुपयांच्या मोमोंची डिलिव्हरी न केल्याने झोमॅटोला दणका! द्यावी लागली ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई

zomato news : कर्नाटकातील एका ग्राहक न्यायालयाने झोमॅटोला चांगलाच दणका दिला आहे. गेल्या वर्षी ऑनलाइन ऑर्डर केलेले मोमोज वितरित न केल्याबद्दल धारवाड येथील एका महिलेला ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहे. धारवाडमधील जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाने ३ जुलै रोजी हा आदेश दिला आहे. आदेशात आयोगाचे अध्यक्ष इशप्पा के भुट्टे यांनी झोमॅटोला शीतलनामक ग्राहक महिलेची केलेली गैरसोय आणि मानसिक त्रास दिल्याने ५० हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चापोटी १० हजार भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

शीतल नावाच्या महिलेने ३१ ऑगस्ट २०२३ रोजी झोमॅटोद्वारे मोमो ऑर्डर केले होते. तसेच या साठी गुगल पे द्वारे १३३.२५ रुपये देखील दिले. ऑर्डर दिल्यानंतर सुमारे १५ मिनिटांनंतर, त्यांना त्यांची ऑर्डर वितरित झाल्याचा मेसेज आला. मात्र, शीतल यांना ना ऑर्डर मिळाली ना कोणी डिलिव्हरी एजंट त्याच्या घरी आला. त्यांनी रेस्टॉरंटला या बाबत विचारणा केली असता डिलिव्हरी एजंटने त्यांच्याकडून ऑर्डर घेतल्याचे सांगितले. त्यांनी वेबसाइटद्वारे डिलिव्हरी एजंटची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, परंतु एजंटने प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर शीतलने ईमेलद्वारे झोमॅटोकडे तक्रार केली. तसेच त्यांना या बाबत माहिती देण्यासाठी झोमॅटोने त्यांना ७२ तास वाट पाहण्यास सांगितले. मात्र, झोमॅटोकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानंतर शीतल यांनी १३ सप्टेंबर २०२३ रोजी झोमेटोला कायदेशीर नोटीस पाठवली. पण नोटीसीला उत्तर देताना न्यायालयाने झोमॅटोच्या वतीने हे आरोप फेटाळले व ही महिला खोटे बोलत असल्याचे सांगितले.

मात्र, या प्रकरणी महिलेने न्यायालयात पुरावे सादर केले असता झोमॅटोने महिलेच्या तक्रारीवर उत्तर देण्यासाठी ७२ तासांचा अवधी मागितल्याचे सिद्ध झाले. मात्र त्यानंतरही त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे कंपनीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. यानंतर, यावर्षी १८ मे रोजी शीतलने सांगितले की २ मे रोजी झोमॅटोने तिला १३३.२५ रुपये परत केले. आयोगाने म्हटले की, यावरून झोमॅटोने चूक केल्याचे दिसून येते आणि त्यामुळे महिलेला अनेक समस्या आणि मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. आयोगाने म्हटले आहे की, "झोमॅटो ग्राहकांनी दिलेल्या ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हर करण्याच्या व्यवसायात करत असून पैसे मिळूनही झोमॅटोने तक्रारदाराला संबंधित खाद्य पदार्थ पोहोचवला नाही. या प्रकरणातील तथ्ये लक्षात घेऊन न्यायालयाने तक्रारदर महिलेच्या बाजूने निकाल देत महिलेला नुकसान भरपाई म्हणून ६० हजार रुपये देण्यास सांगितले आहे.

Whats_app_banner