१००० कोटींचा सौदा! करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सची अर्धी मालकी आता सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पूनावालांकडे
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  १००० कोटींचा सौदा! करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सची अर्धी मालकी आता सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पूनावालांकडे

१००० कोटींचा सौदा! करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सची अर्धी मालकी आता सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पूनावालांकडे

Published Oct 21, 2024 02:31 PM IST

Adar Poonawala in Dharma Productions : सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्समध्ये ५० टक्के हिस्सा खरेदी केला आहे.

१००० कोटींचा सौदा! करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सची अर्धी मालकी आता आदर पूनावालांकडे
१००० कोटींचा सौदा! करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सची अर्धी मालकी आता आदर पूनावालांकडे

Dharma Productions stake sale news : गेल्या काही दिवसांपासून निधी उभारणीच्या प्रतीक्षेत असलेल्या करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनला अखेर मदतीचा हात मिळाला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अब्जाधीश सीईओ आदर पूनावाला यांनी धर्मा प्रोडक्शन्समध्ये ५० टक्के शेअर विकत घेतले आहेत. तब्बल १ हजार कोटींमध्ये हा सौदा झाला आहे.

धर्मा प्रॉडक्शन्स सोमवारी ही माहिती दिली. धर्मा प्रोडक्शन्सची या संदर्भात आधी सारेगामा व रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत बोलणी सुरू होती. मात्र, शेवटी सीरमनं बाजी मारली. त्यानुसार आता धर्मा प्रोडक्शन्समध्ये सेरेन एन्टरटेनमेंटचा ५० टक्के हिस्सा असेल. तर, धर्मा प्रोडक्शन्सकडं ५० टक्के हिस्सा असेल. अपूर्व मेहता हेच कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहणार आहेत.

सोशल मीडियाची धम्माल

धर्मा प्रोडक्शन्स आणि आदर पूनावाला यांच्यात झालेल्या डीलवर सोशल मीडियात मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. 

‘कोविशील्ड लशीसाठी मी दिलेल्या पैशातून आता ते स्टुडंट ऑफ द इयर 3 बनवतील, अशी टिप्पणी विनोदी कलाकार उद्धव परब (@UddhavParab263) यानं X वर केली आहे. मीम उत्सव सुरू करण्याची घोषणा करत सिनेमा रसिक निरुपमा कोत्रू यांनी चित्रपटाची शीर्षकच जाहीर केली आहे.  'व्हॅक्सिन विथ करण, मेडिकल स्टुडंट ऑफ द इयर, कभी कोविड ना कहना, कभी सुई कभी बलगम… अशी नावं तिनं ट्वीट केली आहेत.

आदर पूनावालाची पत्नी नताशा ही बॉलिवूड सोशलाईट आणि करण जोहरची मैत्रीण असल्याकडं लक्ष वेधताना ‘बॉलिवूडसाठी एक बूस्टर शॉट’ असं एका युजरनं म्हटलं आहे. 

धर्मा प्रोडक्शनला यशाचा वारसा

धर्मा प्रोडक्शन ही भारतातील आघाडीच्या चित्रपट निर्मिती आणि वितरक कंपन्यांपैकी एक आहे. यश जोहर यांनी १९७६ मध्ये या कंपनीची स्थापन केली आणि आता करण जोहर ही कंपनी चालवतो. चार दशकांहून जास्त काळाचा वारसा लाभलेला धर्मा प्रॉडक्शन भारतीय चित्रपटसृष्टीत आघाडीवर असून या कंपनीनं समीक्षकांनी गौरवलेल्या व व्यावसायिकदृष्ट्या कमालीच्या यशस्वी ठरलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. किल, बॅड न्यूज रॉकी और राणी की प्रेम कहानी, ब्रह्मास्त्र: भाग एक - शिवा हे धर्मा प्रोडक्शन्सचे काही अलीकडचे चित्रपट आहेत.

Whats_app_banner