Share Market News Updates : कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडनं (KPIL) आपल्या आंतरराष्ट्रीय उपकंपन्यांसोबत मिळून २,१७४ कोटी रुपयांच्या नवीन करारांवर स्वाक्षरी केली आहे. केपीआयएलनं भारतात एलिव्हेटेड मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं डिझाइन आणि बांधकाम करण्याचं कंत्राट मिळवलं आहे. भारत आणि परदेशी बाजारपेठांमध्ये ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन (T&D) व्यवसायाचं कंत्राटही कंपनीला मिळालं आहे.
केपीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष मोहनोत यांनी या संदर्भात माहिती दिली. 'टी अँड डी व्यवसायातील करारामुळं भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आमचं स्थान अधिक मजबूत झालं आहे. जागतिक स्तरावर टी अँड डी प्रकल्पांच्या जोरदार मागणीचं हे द्योतक आहे. केपीआयएल सध्या ३० हून अधिक देशांमध्ये प्रकल्प राबवित आहे. ७५ देशांमध्ये कंपनीचं अस्तित्व आहे.
कल्पतरू प्रोजेक्ट्सचा शेअर आज १.६० टक्क्यांनी वधारून १२७२.३५ रुपयांवर बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान हा शेअर १२८५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर १,४४९.१५ रुपये आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये शेअरनं हा उच्चांक गाठला होता. वार्षिक आधारावर या शेअरनं बीएसईच्या तुलनेत गुंतवणूकदारांना ७७.६४ टक्के परतावा दिला आहे. एक वर्षाचा परतावा ८० टक्क्यांहून अधिक होता.
कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलनं नोव्हेंबरमध्ये २,२७३ कोटी रुपयांचं कंत्राट मिळाल्याची घोषणा केली होती. हे नवे करार भारत आणि परदेशी बाजारपेठेतील ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन (टी अँड डी) व्यवसायतसेच देशातील निवासी इमारत प्रकल्पांशी संबंधित आहेत. नोव्हेंबरमध्ये कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलनं नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर (NCD) जारी करून २०० कोटी रुपये उभे केले.
संबंधित बातम्या