मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Penny Stock : गुंतवणूक असावी तर अशी! एक लाखाचे झाले १४ कोटी, हा चमत्कार कसा घडला?

Penny Stock : गुंतवणूक असावी तर अशी! एक लाखाचे झाले १४ कोटी, हा चमत्कार कसा घडला?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 29, 2024 07:02 PM IST

jyoti resins and adhesives ltd : ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह या कंपनीनं गुंतवणूकदारांना छप्परफाड नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना कोट्यधीश करून टाकलं आहे.

Penny Stock : गुंतवणूक असावी तर अशी! एक लाखाचे झाले १४ कोटी, हा चमत्कार कसा घडला?
Penny Stock : गुंतवणूक असावी तर अशी! एक लाखाचे झाले १४ कोटी, हा चमत्कार कसा घडला?

Penny stock : शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते… हे वाक्य कुठलाही अभ्यास न करता आणि भावनेच्या भरात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खरं आहे. मात्र, पुरेसा अभ्यास करून, पुरेसा वेळ देऊन आणि हातचे राखून गुंतवणूक करणाऱ्यांना हा बाजार कधीच निराश करत नाही. ज्योती रेजिन्स आणि ॲडेसिव्ह लिमिटेडच्या शेअरनं याची प्रचिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या स्मॉल कॅप कंपनीनं तिच्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स आज इंट्राडे व्यवहारात ७.८ टक्क्यांनी वाढले आणि १४१४ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत या शेअरमध्ये तब्ब्ल ५२,६६१ टक्के वाढ झाली आहे. हा शेअर १५ मे २०१४ रोजी २.६८ रुपयांवर होता. तिथून तो १४१४ रुपयांपर्यंत वाढला आहे.

तज्ञांचं मत काय?

वेल्थमिल सिक्युरिटीजच्या संचालक क्रांती भटिनी यांच्या मतानुसार, ' २०१४ च्या आधी मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांनी दीर्घकाळ खराब कामगिरी केली होती. मात्र २०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर, अर्थव्यवस्थेनं अधिक लवचिकता दाखवली आहे. विकासाचा वेग सातत्यानं वाढत आहे. अनेक छोट्या आणि मायक्रोकॅप कंपन्यांनी या बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेतला आहे.

ज्योती रेजिन्स आणि ॲडेसिव्ह लिमिटेड या कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १७८०.०५ रुपये आहे. तर, नीचांक ११८१.०५ रुपये इतका आहे. या कंपनीची मार्केट कॅप १६५८.९४ कोटी रुपये आहे.

शेअर्सची स्थिती

ज्योती रेझिन्स आणि ॲडेसिव्ह्स लिमिटेडच्या समभागांनी दीर्घकाळात त्यांच्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. १८ एप्रिल २००४ रोजी हा शेअर १७ पैशांवर होता. त्याची सध्याची किंमत १४१४ रुपये आहे. याचाच अर्थ २००४ पासून आतापर्यंत या शेअरमध्ये ८,३१,६६४ टक्के वाढ झाली आहे. गुंतवणुकीवर मिळालेल्या नफ्याचा हिशेब केल्यास स्पष्ट चित्र समोर येईल. एखाद्या गुंतवणूकदारानं २० वर्षांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले असते तर आजच्या तारखेला ही रक्कम सुमारे १४ कोटी रुपयांपर्यंत वाढली असती.

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ कंपनीची आणि त्याच्या शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आपल्या व्यक्तिगत सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग