whatsapp channels : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप नव नवीन फीचर बाजारात आणत आहे. या फीचर अपडेटमुळे नागरिकांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत. व्हॉट्सअॅपने आता आणखी नवे फीचर आणले असून यामध्ये युजर्सना चॅनेलजॉइन करून त्यांच्याशी संबंधित अपडेट्स मिळवण्याचा पर्याय दिला जाणार आहे. या बाबत एक नवीन फीचर देण्यात आले आहे. याआधी युजर्सला आपली चॅनेल लिंक शेअर करण्यासाठी ती शेअर करावी लागत होती किंवा चॅनेलजॉईन करण्यासाठी त्याच्या लिंकवर टॅप करावं लागत होतं. मात्र, आता क्यूआर कोड स्कॅन करूनच चॅनेल जॉइन करता येणार असूनत्या संबंधित अपडेट्स देखील तातडीने मिळणार आहे.
मेटाच्या मालकीच्या या अॅपमध्ये युजर्सना चॅनलजॉईन करण्याचा जुना पर्याय मिळत राहणार आहे. नव्या पद्धतीने क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर चॅनेल जॉइन करता येणार आहे. म्हणजेच क्रिएटर्स सध्याच्या चॅनल्ससाठी क्यूआर कोड जनरेट करून शेअर करू शकतील. आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, की क्यूआर कोड हा एक चौरस बारकोड असून त्यात विशेष पॅटर्नमध्ये तपशील किंवा लिंक एन्कोड केल्या असतात.
व्हॉट्सअॅपमध्ये देण्यात आलेल्या नव्या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सला तीन स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
१. क्यूआर कोड जनरेट करावा लागेल. सर्वप्रथम ज्या चॅनेलला तुम्ही बाकीच्यांशी शेअर करू इच्छिता त्या चॅनेलच्या सेटिंग्जमध्ये जा. आता स्क्रीनवर दिसणाऱ्या शेअर कोड पर्यायावर टॅप करा आणि जनरेट केलेला क्यूआर कोड तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
२. क्यूआर कोड शेअर करा
– स्क्रीनवर दिसणारा क्यूआर कोड इतरांसोबत सहज शेअर करता येतो.
- सोशल मीडिया पोस्ट, ईमेल किंवा पोस्टरमध्ये याचा समावेश केला जाऊ शकतो, जेणेकरून कोड जास्तीत जास्त वापरकर्त्यांपर्यंत पोहोचेल.
३. क्यूआर कोड स्कॅन
- कोणीही आपल्या फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून हा क्यूआर कोड स्कॅन करू शकतो.
- कोड स्कॅन होताच युजर थेट चॅनेलजॉईन करू शकणार आहे.
नव्या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चॅनेल सहज शेअर करण्याचा किंवा जॉईन करण्याचा हा अतिशय सोपा आणि त्रुटीनसलेला पर्याय आहे. अशा प्रकारे पोस्टर किंवा कागदावर प्रिंटिंग करताना आणि चॅनेलची पोहोच वाढवताना क्यूआर कोडही शेअर करता येतो.
संबंधित बातम्या