Jio Fiber: ३९५ दिवस अनलिमिटेड डेटा आणि कॉलही फ्री; जिओ फायबर ब्रॉडबँड प्लानबद्दल A टू Z माहिती
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio Fiber: ३९५ दिवस अनलिमिटेड डेटा आणि कॉलही फ्री; जिओ फायबर ब्रॉडबँड प्लानबद्दल A टू Z माहिती

Jio Fiber: ३९५ दिवस अनलिमिटेड डेटा आणि कॉलही फ्री; जिओ फायबर ब्रॉडबँड प्लानबद्दल A टू Z माहिती

Jun 30, 2024 03:14 PM IST

JioFiber 390 Days Plan: जिओ फायबर ग्राहकांना ५ हजारांपेक्षा कमी किंमतीत ३९५ दिवसांसाठी ब्रॉडबँड प्लॅन देत आहे. या प्लॅनमध्ये ३० एमबीपीएस स्पीडसह अनलिमिटेड डेटा आणि कॉल मिळत आहे.

 जिओ फायबर ग्राहकांना ५ हजारांपेक्षा कमी किंमतीत वर्षाभराचा प्लान देत आहे.
जिओ फायबर ग्राहकांना ५ हजारांपेक्षा कमी किंमतीत वर्षाभराचा प्लान देत आहे.

JioFiber Offer: रिलायन्स जिओची एफटीटीएच (फायबर-टू-द-होम) शाखा, जिओफायबर ग्राहकांना ५ हजारांंपेक्षा कमी किंमतीत ३९५ दिवसांचे कनेक्शन देत आहे. ज्यांना वारंवार रिचार्ज करण्यापासून स्वत:ची सुटका करायची आहे आणि परवडणारे ब्रॉडबँड कनेक्शन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चांगली गोष्ट म्हणजे, जिओ फायबर आपल्या सर्व वार्षिक प्लॅनसोबत ३० दिवसांची मोफत सेवा देते. तुम्ही कितीही स्पीड निवडला तरी जिओफायबरचा वार्षिक प्लॅन निवडल्यास तुम्हाला ३० दिवसांची फ्री सेवा मिळते. याशिवाय, ६ महिन्यांचा म्हणजेच अर्धवार्षिक प्लॅन निवडल्यास १५ दिवसांची फ्री सर्व्हिस मिळेल.

जिओ फायबरच्या ४हजार ७८८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३९५ दिवसांची सेवा मिळते. यात ३० दिवसांच्या मोफत सेवेचाही समावेश आहे. हा प्लॅन जिओफायबरचा एंट्री लेव्हल एन्युअल प्लॅन आहे. या प्लानमध्ये युजर्संना ३० एमबीपीएसचा स्पीड मिळतो. जर तुम्हाला अधिक स्पीड हवा असेल तर तुम्ही जिओफायबरच्या हाय स्पीड प्लॅनचाही विचार करू शकता पण त्यांची किंमत नक्कीच जास्त असेल.

JioFiber
JioFiber

सध्या ४ हजार ७८८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३९५ दिवसांची सेवा वैधता असून ३० एमबीपीएस स्पीड (डाऊनलोड आणि अपलोड दोन्ही) आहे. प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड डेटा (दरमहा ३ हजार ३०० जीबी) मिळतो. अनलिमिटेड कॉलिंगसाठी या प्लॅनसोबत फ्री लँडलाईन कनेक्शनही मिळते, फक्त लँडलाईन इंस्ट्रूमेंट ग्राहकाला स्वत: विकत घ्यावे लागते. जिओफायबरच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणताही ओटीटी (ओव्हर-द-टॉप) बेनिफिट मिळत नाही.

ओटीटी बेनिफिट ला प्राधान्य असेल तर तुम्ही ३० एमबीपीएस स्पीडसह येणारा दरमहा ५९९ रुपयांचा प्लॅन निवडू शकता. वार्षिक प्लॅन निवडल्यावर तुम्हाला हा प्लॅन ७ हजार १८८ रुपयांत मिळणार आहे. या प्लानमध्ये डिस्ने+ हॉटस्टारसह एकूण १४ ओटीटी मिळतात. वार्षिक सब्सक्रिप्शन घेतल्यावर या प्लॅनसोबत तुम्हाला ३० दिवसांची फ्री सर्व्हिस देखील मिळते. यामध्ये प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसाठी लँडलाइन कनेक्शनही मिळते. या प्लानमध्ये ८००+ टीव्ही चॅनल्सचाही समावेश आहे.

Whats_app_banner